प्रताप महाविद्यालयाकडून सहलीचे आयोजन
![]()


प्रताप महाविद्यालयाकडून सहलीचे आयोजन
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांचे सहकार्याने दि. ३० सप्टेंबर २०२३ शनिवार रोजी एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
इतिहास विभागामार्फत प्रथमसत्र ‘पावसाळी सहल कालीमठ कन्नडघाट, पितळखोरेची ऐतिहासिक लेणी, जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्या, घृष्णेश्वर मंदीर, (ज्योतिर्लिंग), खुलताबाद येथील औरंगजेब कबर तसेच भद्रामारोती आदि ठिकाणी इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी खान्देश व मराठवाडा प्रदेशातील भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यात. त्या त्या ठिकाणच्या जाणकार मार्गदर्शकाडून प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची माहिती तसेच तिथली वैशिष्ट्ये जाणून घेतली. तसेच पितळखोरे व कैलासमंदिर येथील विविध लेण्यातून, रंगकाम तयार करण्याचे अवशेष, उत्कृष्ठ शिल्पकलेची महिती घेतली.
या शैक्षणिक सहलीचे उदिष्टे विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास कळावा व ऐतिहासिक अभ्यास व्हावा म्हणून आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी या सहलीत गौताळा वनक्षेत्रातील निसर्ग भ्रमंतीचा, पक्षी-प्राणी व वृक्षवेलींचे निरीक्षण व सामूहिक वनभोजनाचा मनमुराद आनंद लुटला
यावेळी सहलीचे समन्वयक प्रा.अवित पाटील, सहल सह समन्वयक प्रा.भाग्यश्री जाधव, इतिहास विभाग प्रमुख व सहल आयोजक व मार्गदर्शक प्रा डॉ धनंजय चौधरी, सहकारी प्रा. प्रसाद मुठे, इतिहासाचे आवडीने संशोधन व संग्रह कार्य करणारे, सहल मार्गदर्शक, माजी प्रतापियन इतिहासाचे विद्यार्थी भूषण महाजन तसेच इतिहास विभागातील ३५ विद्यार्थी- विद्यार्थिंनी या शैक्षणिक सहलीमध्ये सामील झाले होते.
ही सहल अत्यंत प्रेरणादायी, आनंददायी व आयुष्यभर सर्वांच्या स्मरणात राहील अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

