प्रताप महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने स्वच्छता मोहिम
![]()


प्रताप महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने स्वच्छता मोहिम
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व सह चिटणीस डॉ. धीरज वैष्णव यांच्या मार्गदर्शनाने आज १ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमांतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकावर रासेयोच्या विद्यार्थ्यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येकाने रेल्वे स्थानकाच्या आवारातील चाहुबाजूने स्वच्छता केली.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत पवार, महिला कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री जाधव, प्रा. महेंद्र महाजन , अमळनेर रेल्वे स्टेशनचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

