वसंतराव पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…
![]()
वसंतराव पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…

जळगांव प्रतिनिधी-जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता.अमळनेर जि. जळगाव शा.र.देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर येथील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील शिपाई श्री. वसंतराव आनंदराव पाटील हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज आदर्श विद्यालय अमळगाव येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळोद भाग शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन आप्पासाहेब एस. एच. देशमुख हे होते. विचारमंचावर आदर्श विद्यालय अमळगावचे स्कूल कमिटी चेअरमन भाऊसाहेब दीपक भोसले, उच्च माध्यमिक विभागाचे स्कूल कमिटी चेअरमन बापूसाहेब गिरीश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब सी.जी पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे व्हाईस चेअरमन कृषिभूषण दादासाहेब सुरेश पिरन पाटील, मारवड विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व माजी जि.प.सदस्य बापूसो शांताराम साळुंखे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब हरिभाऊ मारवडकर, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासो आर. यु. पाटील निरोपार्थी वसंतराव पाटील त्यांच्या धर्मपत्नी व त्यांच्या आई हे उपस्थित होते. यावेळी श्री वसंतराव पाटील यांना विद्यालयातर्फे स्मृतिचिन्ह, कपडे, शाल व बुके देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी, परिसरातील मित्रपरिवाराने त्यांचा सेवापूर्ती बद्दल सत्कार केला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब डी. बी. साळुंखे, डी.जी.पवार,विद्यालयाच्यावतीने प्रा.शाम पाटील,मुख्याध्यापक आर. यु. पाटील,स्कूल कमेटी चेअरमन बापूसो.गिरीश पाटील यांच्यासह श्री. वसंतराव पाटील यांच्या अनेक नातेवाईकांनी आपले विचार मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषण आप्पासो. एस. एच. देशमुख यांनी केले.
ईशस्तवन व स्वागतगीत विद्यालयाच्या विद्यार्थींनीनी सादर केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीव पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.एस.ए.पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, नातेवाईक बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श विद्यालय अमळगाव येथील सर्व कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विशेष सहकार्य केलं .

