1 min read

बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप

Loading

वडीलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू महिलांना फळे वाटप करताना मोन्टी व विक्की..
मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन सर भद्रा प्रतीक मॉलचे माननीय नगरसेवक आण्णासाहेब प्रताप साळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना..

बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील धार्मिक, सामाजिक सेवेत दान धर्म अन्नदान व व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक असलेले श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक प्रताप छबुलाल साळी मा नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रामुख्याने प्रताप साळी यांचे दोघं सुपुत्र विक्की व मॉन्टी यांनी त्यांच्या संकल्पनेतून वडिलांच्या वाढदिवसाला अमळनेर येथील उप जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील रुग्णांना फळे वाटप करून वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
साळी परिवार सदैव समाजसेवा वारसा तीन पिढ्यांपासून अविरत चालू आहे कुठल्याही संकटात धार्मिक कामात गोरगरिबांच्या मदतीसाठी समाजसेवेसाठी तत्पर असलेले परिवारातील युवा सुपुत्र उद्योजक यांनी आपल्या आजोबा वडील यांच्या समाजसेवेचा वारसा अविरत पुढे चालवीत आहेत.. उपेक्षित तळागाळातल्या लोकांसाठी भद्रा प्रतीक मॉलचे मालक व सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब व आबासाहेब यांचा मदतीचा हात असतो हे तेवढेच सत्य आहे.. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुले मोन्टी व विक्की चांगले कार्य करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *