1 min read

उपक्रमशील शिक्षक सचिन अहिरे ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड’ पुरस्काराने सन्मानित

Loading

उपक्रमशील शिक्षक सचिन अहिरे ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड’ पुरस्काराने सन्मानित

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

दि.२७ सप्टेंबर रोजी केरसाणे ता. बागलाण, नाशिक येथील माध्यमिक शिक्षक श्री. सचिन दिलीप अहिरे यांना ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड’ ने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू प्रा. संजीव सोनवने व अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य लेखापाल सि.ए. चतुर्वेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ .तुळशीदास बास्टेवाड, ऍग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, आबा अहिरे, आयोजक रोहिणी पाटील, प्रकाश सांगळे उपस्थित होते. सचिन अहिरे मविप्र समाजाच्या कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड ता. बागलाण जिल्हा नाशिक येथे कार्यरत आहेत. विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे कार्य हे सदोदित करीत असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थी विकासाचे व्रत घेतलेल्या श्री. अहिरे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *