1 min read

सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न

Loading

सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न


आज दि-२७/९/२०२३ वार-बुधवार रोजी सार्वे केंद्रातील ३ री शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे येथे अतिशय गुणवत्तापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
परिषदेचे आयोजन जि.प.प्राथ. शाळा बाहुटे व जि. प. प्राथमिक शाळा बाभळेनाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिधम मनोरे, दिव्या पाटील सोनल पाटील,हेमांगी पाटील, मयुरी पाटील,त्रुप्ती पाटील या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत उत्तम सादर केले. मा.आण्णासो.श्री. सी.एम.चौधरी, शालेय पोषण आहार अधिक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सार्वे श्री.संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमातच बाहुटे येथील अहमदाबाद,गुजरात येथे स्थायिक असलेले उद्योगपती श्री. मनोहर पंडित पाटील यांच्याकडून 23,000 रू किंमतीचा एचपी कंपनीचा प्रिंटर शाळेला भेट देण्यात आला. तसेच आयोजकांतर्फे सर्व शाळांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु भगिनी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती .
अपेक्षित सर्वच विषयांवर चर्चा व मार्गदर्शन झाले.सदरहू कार्यक्रमात प्रास्ताविक श्री. अरूण पाटील, मुख्याध्यापक बाभळेनाग, सुत्रसंचालन श्री.नंदकिशोर जाधव ,तर आभार श्री.किरण पगारे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाहुटे शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मनोरे,उपशिक्षक श्री.गोरख पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मनोज पाटील, उपाध्यक्ष श्री.जयवंत पाटील, सरपंच श्री.अरूण पाटील,उपसरपंच श्री.भास्कर पाटील,श्री किरण देसले, श्रीमती.मायाबाई पाटील,सौ.बेबाबाई कोळी,सौ. आशाबाई पाटील आदिंनी परिश्रम घेतले.
👏👏👏👏👏📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *