शालेय कामकाजाची माहिती वेळेत द्या- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,भरवस येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..
![]()

शालेय कामकाजाची माहिती वेळेत द्या- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,भरवस येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी- शासनाचे विविध अध्यादेश निघत असतात आम्ही केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून शालेय स्तरावर पाठवतो ..त्यातील अचूक माहिती वेळेत दिली कोणती समस्या निर्माण होत नाही व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे असे अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी भरवस येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन करतांना सांगितले
आज दिनांक 27/09/2023 रोजी भरवस येथे श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक शाळा भरवस येथे बीटसतरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती शहापूर,मारवड,व वावडे केंद्रांतर्गत आयोजक शाळा भरवस,एकतास,खेडी बु अंतर्गत शिक्षण परिषद संपन्न झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर तालुक्याचे लाडके व शिक्षक हितासाठी नेहमी झटणारे मा. गटशिक्षणाधिकारी दादासाहेब रावसाहेब मांगो पाटील होते तर अध्यक्ष म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त नानासाहेब छगन पंढरीनाथ पाटील होते व मार्गदर्शक म्हणून मा.केंद्रप्रमुख दादासाहेब अशोक सोनवणे होते . गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे स्वागत भरवस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सचिव विजय सोनवणे यांनी केले. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक आर.डी चौधरी उपस्थित होते.
अगदी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद पार पडली विविध योजना व अंमलबजावणी संदर्भात व शुरांची यशोगाथा या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन मा. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब दादांनी केले तसेच केंद्रप्रमुख दादासाहेब अशोक सोनवणे सरांनी मार्गदर्शक म्हणून विविध शालेय कामकाजाविषयी सुचना केल्या व मा.केंद्रप्रमुख नानासाहेब छगन पंढरीनाथ पाटील सरांनी शिक्षकांना कामकाजाविषयी सखोल माहिती दिली कार्यक्रमाचे सुञसंचलन मा.मुख्याध्यापिका भरवस संगिता पाटील मॅडम यांनी केले.व आभार प्रदर्शन श्री किरण मोहिते सरांनी केले श्रीमती भारती मॅडम व मा.जाधव सरांनी मान्यवरांचे स्वागत केले.अशा प्रकारे भरवस येथील शिक्षण परिषद संपन्न झाली. त्यावेळी भरवस माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इतर शाळेतील जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

