धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा
![]()



धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा
अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील होते तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.महादेव तोंडे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता चंद्राकर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होतो हे सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना स्वावलंबन, श्रम ,सामाजिक बांधिलकी, समता ,बंधुता ,राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्य अशा विविध गुणांची निर्मिती विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांमधून निर्माण होते हे सांगितले. तसेच प्रा. महादेव तोंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आणि देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट केले.
तसेच डॉ.लीलाधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना. सामाजिक बांधिलकी, नैतिकता, आणि स्वयंसेवकांचे कर्तव्य काय आहेत याचे मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी, महाविद्यालयाचे संपूर्ण प्रांगण झाडून स्वच्छ केले. आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली. यातून जीवनात सर्वांनी स्वच्छतेचा गुण अंगीकारावा हा संदेश दिला गेला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.प्रवीण पवार, डॉ. राहुल इंगळे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. भगवान भालेराव, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. चौधरी आणि राजेंद्र पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.

