ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
![]()

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थिनीने कॅरम स्पर्धेत यश संपादन केले.
दिनांक 27.9.2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय चौदा वर्षे वयोगटातील कॅरम स्पर्धेत शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी चाहत पाटील हिने पाचवा क्रमांक मिळवत असून तिची विभागास्तरावर निवड झालेली आहे. तिला क्रिडा शिक्षक केदार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
कु.चाहत पाटिल हिचे शाळेचे संचालक श्री. पराग पाटील, प्राचार्य श्री. निरज चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले आहे.

