1 min read

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे – प्रतिक कोळपे

Loading

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे – प्रतिक कोळपे

लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात आला आहे या अनुषंगानेच ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ, साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे यांचे चिरंजीव प्रतिक दादा कोळपे यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश्वर महादेव मंदिर डोंगर परिसरात दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम प्रतिक दादा कोळपे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या वेळी प्रतिक दादा कोळपे,ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, हवेली तालुका उपाध्यक्ष नितीन काळभोर, सचिन महानवर, स्वप्नील आप्पा धुमाळ,भाऊसाहेब करे,दादा कोळपे,अमोल कोळपे,जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, गणेश पातडे उपस्थित होते.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे.वाहने, कांपण्यामधील धूर, विविध प्रकारचे विषारी वायू यांनी आपले वातावरण भरून जाते. झाडे हे विषारी वायू वातावरणात पसरण्यापासून रोखून पर्यावरण प्रदूषित होण्यापासून रोखतात.
पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत.पर्यावरण संतुलनाच्या बाबतीत झाडांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जमिनीची धूप थांबण्यास मदत करतात त्यामुळे वृक्षारोपण करून मोठ्याप्रमाणात वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.अलीकडे प्रदूषण ही मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे. इंधनाच्या ज्वलनामुळे, कंपन्यांनामधील वेगवेगळ्या वायूंमुळे, वृक्षतोडींमुळे जागतिक तापमानवाढ ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. वृक्ष हवा स्वछ ठेवण्यात मदत करतात.
वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमीकमी होत आहे. जिथे झाडे नाहीत तिथे पाऊस फार कमी पडतो असे प्रतिपादन प्रतिकदादा कोळपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *