काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुखपदी विलासराव पाटील
यांची नियुक्ती
![]()


काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुखपदी विलासराव पाटील
यांची नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत तिस सेल कार्यरत आहेत. यातील शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख पदी धुळे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांचे शिफारशीवरून महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांनी नियुक्ती केली आहे. सदरचे नियुक्ती पत्र टिळक भवन, दादर मुंबई येथे मा. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रशासन व संघटन
सरचिटणीस मा. प्रमोदजी मोरे, देवानंदजी पवार व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. प्रकाशजी सोनवणे हे कार्यरत आहेत.
विलासराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य मोठे आहे. त्यांनी यापूर्वी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघावर सहकार्यवाह धुळे जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक कर्म. सह. पतसंस्थेचे संचालक
म्हणून १५ वर्ष व व्हा. चेअरमन म्हणून ५ वर्ष कार्य केले आहे. ओ.बी.सी. विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोशिएशनचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळवणे, ओ.बी.सी. महामंडळाकडून उच्च शिक्षणासाठी कर्ज क्रिमीलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी
शासनाकडे पाठपुरावा व त्यात यश मिळवले आहे. याच संस्थेमार्फत उत्तर महाराष्ट्रातील शेकडो शिक्षकांना महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन दि. २८ नोव्हेंबर निमित्ताने “गुरू गौरव” पुरस्कार
देवून सन्मानित केले आहे. शिक्षक सुरक्षा कायदा-२०१२ ची मागणी करून शिक्षकांना सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे मागणी व पाठपुरावा सुरू आहे. एकदिवशीय पटपडताळणीच्या शासन निर्णयाविरूध्द तत्कालीन शिक्षण मंत्री मा. राजेंद्रजी दर्डा यांना भेटून निवेदन दिले होते. विलासरावांनी देवळी
ता. अमळनेर जि. जळगांव येथे महात्मा जोतीराव फुले हायस्कूल सन २००० ला सुरू केले असून ते संस्थापक चेअरमन आहेत. त्यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक २००६, २०१२,
२०१८ या वर्षी लढवली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नंची जाण आहे. ते अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून समाजासाठी मागील ३५ वर्षापासून विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. ओ.बी.सी. ची जातवार जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रामाणिक ओ.बी.सी.
कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांचे काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पुरोगामी चळवळीतील पदाधिकरी यांनी अभिनंदन केले आहे.

