1 min read

विजयसिंग पवार यांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याबद्दल झाला सत्कार

Loading

विजयसिंग पवार यांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याबद्दल झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथील स्पर्धा परीक्षेचे संचालक, उपक्रमशील शिक्षक विजयसिंह पवार यांचा नुकताच उत्कृष्ट कार्याबद्दल मंगळ ग्रह येथे सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
विजयसिंह पवार हे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मार्गदर्शन करून आजतागायत अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. या अगोदरही त्यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. साने गुरुजी वाचनालयात दर रविवारी नियमित विनामूल्य स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात व विद्यार्थ्यांसाठी विविध अधिकारी वर्गांना सुद्धा आमंत्रित करीत असतात.
मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे एका दिमाखदार सोहळ्यात माननीय ना.दादासो अनिल पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री), खासदार माननीय उन्मेष पाटील,माजी आमदार दादासो साहेबराव पाटील, माजी आमदार ताईसो स्मिता वाघ, माजी आमदार दादासो शिरीष चौधरी, महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक माननीय कैसर खालिद साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त यांचे त्यांनी खुप खुप आभार मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *