प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा


अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि.२४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय मांटे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रासेयो गीताने झाली.
याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप नेरकर (सदस्य : अधिसभा कबचौउमवि जळगाव) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण समाजाच्या विविध घटकांसाठी वेगवेगळ्या निमित्ताने समाजकार्य व देशसेवा करू शकता येते. त्यामुळे स्वतःचे व समाजाचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या घडू शकते. अर्थात सहजपणे त्यामुळे सामाजिक विकास साधला जातो.” असे मत व्यक्त केले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलेश पवार, प्रा. अवित पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत पवार यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील राजपूत यांनी मानले.
यावेळी डॉ. रवी बाळस्कर, प्रा. नितीन पाटील, डॉ. योगेश तोरवणे, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. वसावे तसेच रासेयोचे १५० स्वयंसेवक उपस्थित होते.

