1 min read

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडे

Loading

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडे
आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी मध्ये ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्युकेशनल असोसिएशन परिसंवादाठिकाणी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार किशोर दराडे उपस्थित होते त्या ठिकाणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड व कार्याध्यक्ष शैलेश राणे यांनी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संदर्भातील विविध समस्यावर आमदार किशोर दराडे यांच्याशी चर्चा केली यामध्ये शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण जी आर रद्द झाला पाहिजे , त्याचबरोबर शिक्षकांना शालाबाह्यकामांतून मुक्तता मिळाली पाहिजे तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील सन 2012 नंतर पायाभूत पदांना शासन स्तरावरून मान्यता मिळाली पाहिजे , आय टी विषयाला अनुदान मिळाले पाहिजे , प्रलंबित शालार्थ फाईल तात्काळ निकाली निघाल्या पाहिजेत, तसेच मंत्रालयातून मंजूर होणाऱ्या वैद्यकीय वैद्यकीय बिलांना तात्काळ मंजुरी मिळाली पाहिजे. अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली याप्रसंगी मिलिंद पाटील, सुधीर चौधरी किरण झांबरे ,भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील प्रा राहुल वराडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *