सत्यशोधक समाजाच्या नाशिक ४१ व्या राज्य अधिवेशनाची तयारी पूर्णत्वाकडे
![]()

सत्यशोधक समाजाच्या नाशिक ४१ व्या राज्य अधिवेशनाची तयारी पूर्णत्वाकडे
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या सत्यशोधक समाजाचे 41 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी सत्यशोधकी नगर,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड जेजुरकर मळा नाशिक येथे संपन्न होत आहे.उद्घाटन छत्रपती संभाजी राजे ( सत्यशोधक राजश्री शाहू महाराज वंशज ) यांना कार्याध्यक्ष अप्पा जगताप,संयोजक अशोक सोनवणे,समन्वयक आर .जी.निकुंभ व जयराम सोनवणे यांनी प्रत्यक्ष सन्मानपूर्वक पत्रिका देऊन सादर आमंत्रण दिले.स्वागताध्यक्ष विश्वासराव मोरे (सत्यशोधक गणपत दादा मोरे यांचे नातू तथा उपाध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज ) यांना सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार , कार्याध्यक्ष व संयोजक यांनी कार्यक्रम पत्रिका देऊन सादर आमंत्रित केले.समारोप सत्राचे प्रमुख अतिथी माननीय नामदार छगनरावजी भुजबळ ( अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ) यांची प्रत्यक्ष भेट संघ अध्यक्ष अरविंद खैरनार ,कार्याध्यक्ष आप्पा जगताप, भाऊसाहेब जाधव,जयराम सोनवणे यांनी घेऊन सादर आमंत्रित केले त्यावेळी साहेबांनी संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन संमेलन यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांना गुरुमंत्र दिला. संमेलनाच्या द्वितीय सत्राचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र कुंभार ( माजी सचिव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र व साधने समिती ) यांना अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी प्रत्यक्ष भेटून सदर कार्यक्रम पत्रिका देत आमंत्रित केले .तृतीय सत्राचे सन्माननीय अध्यक्ष तथा सत्यशोधक चळवळीचे संशोधक विचारवंत लेखक जी.ए.उगले साहेब यांना पैठणच्या निवासस्थानी जाऊन अध्यक्ष अरविंद खैरनार,ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश शित्रे व विधीकर्ते साळूबा पांडव यांनी पत्रिका देत अधिवेशनास सादर आमंत्रित केले यावेळी उगले यांनी अधिवेशन शिस्तीत व नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन मार्गदर्शन केले.कार्यकर्त्यांनी उगले साहेबांच्या तब्बेती संबंधी चर्चां केली.संमेलन एकूण तीन सत्रात आहे. पहिल्या सत्रात विषय ‘ संशोधकांनी सत्यशोधक प्राध्यापक हरी नरके यांच्याकडून काय प्रेरणा घ्यावी ‘ असून उद्बोधन माजी अध्यक्ष 84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे करतील.यावेळी हरी नरके यांच्या सुकन्या प्रमिती नरके या मनोगत सादर करतील.द्वितीय सत्राचा
विषय ‘ सत्यशोधक समाजाची चळवळ आणि काळाची गरज आहे. ‘ या सत्राचे प्राध्यापक आर.जी.भोंग प्रमुख वक्ते असून डॉ.राजेंद्र कुंभार ( कोल्हापूर ) अध्यक्ष आहेत.तृतीय सत्रात विषय ‘ वर्तमानातील शेतकरी, शैक्षणिक धोरण व त्यात सत्यशोधक चळवळीची भूमिका ‘ असून अध्यक्षस्थानी माननीय जी.ए.उगले ( सत्यशोधक चळवळीचे संशोधक विचारवंत व लेखक ) राहतील.या सत्रात प्राध्यापक सुनील देवरे ,रायगड व विश्वासराव पाटील,जळगाव प्रमुख वक्ते आहेत.अधिवेशनाच्या समारंभ सत्रास माननीय नामदार छगन भुजबळ साहेब अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा अध्यक्ष अ.भा.महात्मा फुले समता परिषद यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे .या सत्रात माननीय आमदार सुधीर तांबे ( पदवीधर मतदारसंघ ) तसेच माननीय समाधान जेजुरकर व माननीय माधव कांबळे मान्यवरांची उपस्थिती .
संस्थापक सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे यांचा प्रचार प्रसाराचा झंझावात
सत्यशोधक समाजाचे संस्थापक राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे उत्तर महाराष्ट्रात संमेलनाच्या यशस्वीसाठी अथक परिश्रम करीत आहेत.एकाच दिवशी २ ते ४ सभांमध्ये ते मोटार सायकलचा ३०० ते ४०० किलोमीटरचा भुक तहान विसरून अथक प्रवास करुन प्रचार व प्रसार तथा उद्बोधन करीत आहेत.आजच्या काळात वैदिक संस्कृतीच्या जाळ्यात अडकून अविवेकाने वागणाऱ्या परंपराधीन व अंधश्रद्धाळू समाजाला ते सत्यशोधिकी विचारांचे महत्त्व सांगतात. संमेलनाला यशस्वी करण्याचे आवाहन करून आर्थिक निधी देण्यासाठी विनम्र आवाहन करीत आहेत.डॉ. झाल्टेंच्या अभ्यासपूर्ण व आवेशपूर्ण मुद्देसूद भाषणामुळे खूप छान परिणाम होऊन निधी संकलनाला वेग आल्याने सभा आयोजक कार्यकर्त्यांमधेही चैतन्य संचारते. बहुसंख्येने अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन भारावून गेलेले श्रोते व कार्यकर्ते डॉ.झाल्टे यांना देतात.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी जाधव,श्रीमती अलका मंडलिक,क्रांती जाधव,वंदना वनकर ,विजया नेरकर,अनिता देवतकर झपाटल्याप्रमाणे काम करीत आहेत.कॉम्रेड सतीश खैरनार,अशोक मंडलिक,भारत जाधव,प्राध्यापक रामदास भोंग , पत्रकार सुरेश बच्छाव (सटाणा )अमूल्य परिश्रम करीत आहेत.खान्देशात शिरपूर येथील कार्यकर्ते राकेश माळी,कैलास सोनवणे,भटू पाटोळे नंदुरबार कार्यकर्ते डॉ. डि.बी.शेंडे,आर्किटेक्ट नरेंद्र जाधव,विश्वासराव पाटील (अमळनेर ),अधिवेशन प्रसिद्धी समिती सदस्य विजय लुल्हे (जळगाव ) व प्रमोद पाटील ( धरणगाव ) तसेच चाळीसगाव येथील विधीकर्ते भगवान रोकडे ,जिल्हा समन्वयक कैलास जाधव ,रवींद्र तितरे,विधीकर्ते शिवदास महाजन व कविराज पाटील ( एरंडोल ),रमेश वराडे ( जामनेर ),हेमंत माळी ( धरणगाव ), जितेंद्र महाजन ( लासूर ) अमूल्य परिश्रम घेत आहेत. सत्यशोधक भगवान रोकडे यांनी खास अधिवेशनसाठी सत्यशोधकी विचारवंत जी.ए.उगले संशोधित सत्यशोधकी समाजाचा सत्यमेव जयते ब्रीद असलेला पिवळा हिरवा व मध्यभागी लाल रंग मध्यभागी सत्यमेव जयते ब्रीद वाक्य असलेले 3 x 5 फूट आकाराचे 5 ध्वज खादीचे तयार केले आहेत.
संस्मरणीय ऐतिहासिक सहकार्य
[ सत्यशोधक समाधान जेजुरकरांचा होणार अधिवेशनात विशेष हृद्य सत्कार ]
नाशिक येथील सत्यशोधक समाधान जेजुरकर ( जाधव ) ‘यांनी एकदिवसीय अधिवेशनासाठी जयशंकर गार्डन लॉन्स विनामूल्य सर्व सुविधांसह उपलब्ध करून दिलाय.या लॉन्सचे एका दिवसाचे भाडे दीड लाख आहे.समाधान जाधव हे महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तत्वनिष्ठेने चालवत आहेत.त्यांनी आपले लग्न सत्यशोधकीय पद्धतीने केले असल्याने ते कृतीशील कार्यकर्ते आहेत.त्यांच्या या सत्यशोधकी औदार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या ऐतिहासिक आर्थिक सहकार्याबद्दल अधिवेशनात त्यांचा विशेष सत्कार केला जाईल असे संमेलनाचे कार्याध्यक्ष आप्पा सोनवणे यांनी सांगितले.
अधिवेशनास विशेष सहकार्य करणाऱ्या नाशिक येथील विविध संघटना : –
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,महात्मा फुले समाज विकास संस्था,महात्मा फुले समाज शिक्षण संस्था,अखिल भारतीय माळी महासंघ,संत सावता माळी मंडळ,माळी समाज सेवा समिती, क्रांतीसुर्य महात्मा फुले कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ नाशिक रोड, सत्यशोधक महिला महासंघ, महाराष्ट्र राज्य महात्मा फुले मित्र मंडळ खुटवडनगर, स्वराज्य संघटना , बुद्ध सागर बहुउद्देशीय मंडळ सातपूर,धम्मदुत बुद्ध विहार,श्रमिक नगर सातपूर, नालंदा बुद्ध विहार श्रमिक नगर ,जेतवन बुद्ध विहार,श्री आदीयोगी फाउंडेशन,गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सातपूर
प्रसिद्धीसाठी अजोड सहकार्य : –
वेध न्यूज , क्रांतीसुर्य न्यूज, सत्यशोधक वार्ता
सत्यशोधक समाजाच्या ऐतिहासिक संमेलनास शिवराय, फुले, शाहू , आंबेडकर विचारांच्या मंडळींनी तसेच सत्यशोधक कार्यकर्त्यांनी सहकुटुंब सहपरिवार व आप्तेष्टांसह येऊन अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष आप्पा जगताप, संयोजक अशोक सोनवणे,सहसंयोजक भाऊसाहेब जाधव ,निमंत्रक अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव सुरेश झाल्टे, सहसचिव सुनील देवरे, खजिनदार नरेंद्र जाधव, प्रसिद्धी समिती सदस्य विजय लुल्हे ( जळगाव ), प्रमोद पाटील ( धरणगाव ), विधीकर्ते भगवान रोकडे व शिवदास महाजन,संयोजन समिती सदस्य रवींद्र तितरे व कविराज पाटील यांनी केले आहे.

