1 min read

१ऑक्टोबर रोजी, देशभरातील कर्मचारी केंद्र शासनास दाखवणार आपली ताकद

Loading

१ऑक्टोबर रोजी, देशभरातील कर्मचारी केंद्र शासनास दाखवणार आपली ताकद

१ ऑक्टोबर ,दिल्ली रामलीला मैदान येथे जुनी पेन्शनसाठी होणार “पेन्शन शंखनाद आंदोलन” ; आंदोलनात देशभरातील १० लाख कर्मचारी तर महाराष्ट्रातील ३०हजार कर्मचारी आंदोलनात सामील

आंदोलनाचा मोटो :- खासगीकरण,एनपीएस भारत छोड़ो महारैली
—————–———————————–
सोयगाव प्रतिनिधी
देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी, १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या “पेन्शन शंखनाद रॅली” च्या माध्यमातून आपली कर्मचारी एकतेची ताकद केंद्र सरकारला दाखवणार आहेत.या राष्ट्रीय पेन्शन आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी जय्यत तयारीत आहेत.देशातील नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि जाचक नवीन पेन्शन योजना हटवण्याची हे महाआंदोलन ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय जुनी पेन्शन चळवळ संघटना (NMOPS,India) चे अध्यक्ष विजय कुमार बंधू व NMOPS चे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात या राष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात होत असलेले शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व शेअर बाजारावर आधारित असलेली नवीन पेन्शन योजना हटवून पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना बहाल करणे व शासकीय नोकऱ्यांचे बाजारीकरण थांबवणे यासाठी हे राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.तसेच मागण्या मान्य न झाल्यास (#voteforops) वोट फॉर ओपीएस माध्यमातून कर्मचारी सत्तांतर करून दाखवतील हा इशारा ही दिला जाणार आहे.
या पेन्शन शंखनाद आंदोलनासाठी देशभरातील जवळपास १० लाखांपेक्षा ही जास्त कर्मचारी येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील २५ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.आतापर्यंत साडे तीन लाख रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यात आल्याचे समजते आहे.तसेच उर्वरित कर्मचारी खाजगी वाहनाने,विमानाने दिल्ली येथे ३० सप्टेंबर रोजीच दाखल होणार आहेत.आंदोलनाची तयारी म्हणून एकच मिशन,जुनी पेन्शन!,पुरानी पेन्शन योजना बहाल करो!,शासकीय नोकरीचे खाजगीकरण हटवा!,पेन्शन शंखनाद आंदोलन लिहलेले टी शर्ट,टोप्या बनवण्यात आले आहेत.मागणी संदर्भात असे विविध हँड बॅनर ही बनवण्यात आले आहेत.
देशभरातील विविध खात्यातील केंद्रीय तसेच राज्य कर्मचारी पेन्शन शंखनाद आंदोलनात सहभागी होणार आहेत.पोस्ट,महसूल, वन,कृषी,ग्राम,शिक्षण,पाटबंधारे,आरोग्य,सुरक्षा,बँकिंग,मंत्रालयीन क्षेत्रातील कर्मचारी जुनी पेन्शनसाठी व शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण रोखण्यासाठी, मोठ्या संख्येने व पूर्ण ताकतीने दिल्लीत भिडणार आहेत.तसेच येणाऱ्या विधानसभा,लोकसभा निवडणुकीत कर्मचारी मतपेटीतून आपली ताकत वोट फॉर ओपीस मोहिमेच्या माध्यमातून शासनास दाखवून देणार आहेत.
देशातील अनेक राज्य आजही जुनी पेन्शन योजना लागू करण्यास तयार आहेत मात्र केंद्र शासनाच्या अडेल भूमिकेमुळे राज्य शासनाचा नाईलाज होत आहे.केंद्र शासनाने सरसकट देशात जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास केंद्रातील शासनाला पायउतार करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.हेच या आंदोलनातुन कर्मचारी दाखवून देणार आहेत.

या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू
पश्चिम बंगाल,राजस्थान, छत्तीसगड,झारखंड,पंजाब,हिमाचल प्रदेश येथे बहाल तर कर्नाटक घोषणा झाली असून आदेश बाकी आहे.
या राज्यात कर्मचाऱ्यांनी केले सत्तांतर
वोट फॉर ओपीएस च्या माध्यमातून डिसेंबर मध्ये हिमाचल प्रदेशात तर मे महिन्यात कर्नाटक येथे सत्तांतर करून दाखवले आहे.तसेच आगामी नोव्हेंबर महिन्यात मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड, तेलंगणा येथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून तेथेही वोट फॉर ओपीएस राबविले जाणार आहे.
काय आहे वोट फॉर ओपीएस?
जो पक्ष जुनी पेन्शन योजना बहाल करेल त्याच पक्षाला कर्मचारी, त्याचे कुटुंब,नातेवाईक, मित्रपरिवार मतदान करतील.अर्थात एक कर्मचारी किमान ५० मते जुनी पेन्शन नाकारणाऱ्या पक्षाच्या विरोधात टाकणार आहेत.
शंखनाद रॅलीसाठी मुंबई ते दिल्ली सायकलवारी
मालेगाव (नाशिक) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर डी निकम शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या शंखनाद आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून ३ सप्टेंबर पासून मुंबई येथून दिल्लीच्या सायकलवारीस निघाले आहेत.१ऑक्टोबर ला ते दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहेत.
कोट
कर्मंचाऱ्याचा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास लोकसभा निवडणुकीतच केंद्र सरकार ला VoteforOPS चा प्रभाव दिसेल.
वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.
कोट
कश्मीर से कन्याकुमारी तक कर्मचारी 1 ऑक्टोबर के शंखनाद रॅली में सम्मेलीत होने वाले है। हमारे प्रधानमंत्री जी सें निवेदन है की वह जल्द से पुरानी पेंशन बहाल करे अन्यथा इसका खाजीयाज केन्द्र सरकार को लोगसभा चुनाव में भुगतना पड सकता हे।
विजयकुमार बंधू,राष्ट्रीय अध्यक्ष, NMOPS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *