धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन
![]()


धनदाई महाविद्यालयात रासेयो तर्फे मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन
अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमांतर्गत अमृत कलश माती संकलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी अमृत कलशात एक मूठ माती टाकून केले. अमळनेर तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थ्यांनी आणलेल्या मातीचे संकलन असलेला हा कलश लवकरच विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास सुपूर्द करण्यात येणार आहे .
धनदाई महाविद्यालयाच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सुमारे ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या गावाची मूठभर माती या उपक्रमासाठी आणली होती. ‘सदर उपक्रमाद्वारे भारताचे नाव हे ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले जाणार असून या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतातून तरुणांचा सहभाग असल्याची माहिती’ उपप्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी दिली. तसेच सरकारने दिलेल्या “मेरी माटि मेरा देश” या वेबसाईटवर महाविद्यालयाच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून अपलोड केल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. महादेव तोंडे यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता चांद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले मेघना भावसार, उपप्राचार्य डॉ. राहुल इंगळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. किशोर पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रमेश पावरा, डॉ. बी. बी. भालेराव तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

