संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव.
![]()


संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. –मनोज देव.
जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे.कॉलेज (स्वायत्त) जळगाव येथे विज्ञान मंडळातर्फे ‘संशोधनाकडे वळा’ या विषयावर आय. सी.टी.माटुंगा (मुंबई) येथील बायो प्रोसेस टेक्नॉलॉजीचे रिसर्च फेलो श्री.मनोज देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.मनोज देव यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विज्ञान मानवी जीवनातील अविभाज्य घटक असून विज्ञानाची उकल करावयाची असेल तर संशोधनाचा अर्थ समजून घेऊन त्याकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन केले. त्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा व त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचा इतिहास विषद करून संशोधनाचे महत्त्व व त्याची व्याप्ती यांची मौल्यवान माहिती देऊन विद्यार्थ्यांना संशोधनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याचा मौलिक सल्ला दिला. सृष्टीतील अस्तित्वात असलेल्या घटकांची उकल करायची असेल तर संशोधनाकडे वळणे गरजेचे आहे. संशोधनासाठी सुक्ष्म निरिक्षण व आकलन क्षमतेचा व्यवहार्य जीवनात विनिमय करणे विद्यार्थ्यांनी जीवनात विकसीत करणे आवश्यक आहे. संशोधनातून करियरच्या उत्तम व बहुविध वाटा आहेत. याव्दारे स्वतःच्या व पर्यायाने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देता येईल असा संदेश त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे तर मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा सचिव जेष्ठ संशोधक प्रा.डि.एस. भारंबे, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, कला शाखेचे समन्वयक प्रा.उमेश पाटील व विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा.घनश्याम सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.चारुलता बेंडाळे,आभारप्रदर्शन प्रा. शोभना कावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शोभना कावळे, डॉ.अतुल इंगळे, प्रा.संदिप वानखेडे, प्रा. प्रमोद भोई, प्रा. स्वप्ना पाटील, प्रा.वीणा भोळे, प्रा.जयंत इंगळे, प्रा.संदिप गव्हाळे यांनी परिश्रम घेतले.

