1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आरोग्य तपासणी संपन्न..

Loading

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न——-!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर प्रसंगी डॉ. गणेश पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. प्रिया पटेल सर्व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अमळनेर व वैशाली पाटील औषध निर्माती आणि पूनम नारे- ए.एन.एम. ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांनी मोलाचे सहकार्य करून सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक रित्या आरोग्य तपासणीकामी सहकार्य केले. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डी.ए. सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ‘आपलं आरोग्य हेच जीवनाच मोलाच रहस्य’! याविषयी माहिती दिली. आणि सर्व डॉक्टर व सहकारी यांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे व रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *