रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा मोठ्या उत्साहात तरुणांनी आपल्या कलेतून केले प्रबोधन
![]()

“रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा मोठ्या उत्साहात तरुणांनी आपल्या कलेतून केले प्रबोधन
भिवंडी प्रतिनिधी
मिलिंद जाधव
शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक, युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांच्या
कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी समता -संघर्ष (संघटन) यांच्या वतीने शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेवर आधारीत विशेष युवकांसाठी
“रेनी कार्निवल” संवाद तरूणाईचा या कार्यक्रम रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील पाच्छापूर रोड जवळील दोंदे ॲग्रो फार्म येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शैलेश दोंदे असून कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेता
सुदेश जाधव यांनी केले . तर प्रमूख म्हणून उपकुलसचिव कृष्णा पराड, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिका आशालता कांबळे उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद गायकवाड यांनी केले. चळवळ जिवंत ठेवायची असेल तर आजच्या तरुणांना एकत्र आणणे काळाची गरज आहे. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमात विशेष म्हणजे तरुणांची “संसद सवांद” भरवण्यात आली असून त्यात तरुणांनी “मणिपूर” घटनेवर आपले मते मांडली. हा उपक्रम खास आकर्षण ठरला. तर यावेळी, भिवंडी, शहापूर,कल्याण , बदलापूर , अंबरनाथ,मुरबाड, मुंबई येथिल तरुणांनी कविता, गाणी, समुहगिते ,एकपात्री अशा विविध कला सादर करुन प्रबोधन केले. यावेळी समता संघर्षचे पदाधिकारी सदानंद गायकवाड, गणेश सोष्टे, संजय इधे, अँड.दिलिप वाळज, अँड.विलास धनगर, अँड . श्रीकांत कांबळे,संजय गायकवाड तर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्व्यक मिलिंद जाधव , सुरेखा पैठणे, रोहित जाधव,अक्षय भोईर,संघरत्न घनघाव , सागर भोईर,माधुरी शिंदे,पंकज चाळके,विशाल सोष्टे,किशोर सावंत,संजीवकुमार शिंदे ,दुहिता जाधव, डॉ.सिद्धांत दोंदे,प्रा हरेंद्र सोष्टे, सूरज भालेराव , यश कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

