1 min read

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव एकरा उर्दू हायस्कूल मोहाडी परिसर येथे संपन्न…

Loading

आज तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव एकरा उर्दू हायस्कूल मोहाडी परिसर येथे संपन्न झाला. यावेळी खलील शेख प्रभारी गटशिक्षणाधिकारी, विजय पवार प्रभारी अधीक्षक शा पो आ,जितेंद्र चिंचोले शिक्षण विस्तार अधिकारी, एकरा उर्दूचे मुख्याध्यापक काझी सर केंद्रप्रमुख अनिता परमार, वैशाली बाविस्कर , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष संजय खंबायत सर, संपादक साधना लोखंडे, जळगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोरखेडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षक म्हणून श्री गोपाळ महाजन, एस पी कुलकर्णी, सविता पाटील यांनी काम पाहिले.
तालुका नाट्य स्पर्धेत 16 शाळांतील सुमारे 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांक गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी तर उत्तेजनार्थ थेपडे विद्यालय म्हसावद व नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय जळगाव यांनी मिळवले. सूत्रसंचालन मानसी उपासनी यांनी तर आभार प्रदर्शन किशोर रडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *