1 min read

२९ सप्टेंबरला ईद ए मिलाद साजरी करणार बाबत मुस्लीम समाजाचे डिवाएसपी व पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन

Loading

२९ सप्टेंबरला ईद ए मिलाद साजरी करणार बाबत मुस्लीम समाजाचे डिवाएसपी व पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना बंदोबस्तासाठी मदत व्हावी म्हणून अमळनेरला मुस्लीम समाजाचा निर्णय..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक १६-०९-२०२३ रोजी चंद्र दर्शन झाले. त्यावरून ईद ए मिलाद दिनांक २८-०९-२०२३ रोजी येणार होते.
अमळनेर पोलीसांकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व पंच यांनी बैठक घेतली.
त्याप्रमाणे सर्व मुस्लिम समाजाने एकमताने निर्णय घेऊन त्यांनी हिंदू समाजाचा गणपती विसर्जन हा महत्वाचा सण असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना बंदोबस्त साठी मदत व्हावी म्हणून दिनांक २९-०९-२०२३ रोजी ईद ए मिलाद साजरी करणार बाबत लेखी निवेदन अर्ज दिला आहे. सदर निवेदन अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नसीर हाजी शेख,
हाजी शब्बीर पहलवान,फिरोज पठाण(मिस्त्री),आरीफ भाया,मुख्तार खाटीक, इम्रान खाटिक, रियाज़ शेख,
इकबाल शेख,मुस्ताक मूजावार,
इमरान खाटीक अशा मान्यवर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील नंदवाडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *