बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी द्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा अध्यादेश रद्द करा,जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे निवेदन
![]()

बाह्य यंत्रणेमार्फत कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी द्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्तीकरणे बाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची जळगाव जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेची मागणी . आज दि.18/09/2023 सोमवार रोजी जळगाव जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेकडून निवासी उपजिल्हाधिकारी मा.सोपान कासार साहेब जळगाव यांना निवेदन…… सदरहू कायदा वेठबिगारी निर्माण करणारा काळा कायदा रद्द करण्यासाठी शिक्षक भारती संघटना राज्यभर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे . निर्णय रद्द करण्याची कारणे पत्रात सविस्तरपणे नमुद करण्यात आले आहेत. या प्रसंगी शिक्षक भारती प्राथमिक जळगाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील,जिल्हाउपाध्यक्ष संदिप पाटील,जिल्हासहकार्यवाह निलेश इंगळे,जिल्हा का.का.सदस्य विनोद नाईक जळगाव तालुकाध्यक्ष पंकज गरुड,भास्कर वानखेडे उपस्थित होते.

