1 min read

जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरज पाटीलची इंडियन आर्मी मध्ये निवड

Loading

जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरज पाटीलची इंडियन आर्मी मध्ये निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
यश ही खडतर संघर्षांची कहाणी असते, पण काही संघर्ष इतके प्रेरणादायी असतात की त्यांच्यासमोर यशाचा रंगही फिका पडतो. देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी सुरज आधार पाटील याची यशोगाथाही अशीच आहे.लहाणपणीच तिन वर्षाचा असतांना मातृछत्र हरवले..
दिड वर्षाची लहान बहीण अश्वीन पाटील… सुरजच्या आजीने दोघे भावंडांची जबाबदारी घेत त्यांना योग्य संस्काराचे बाळकडू दिले.
दोघ भाऊ बहीनीने महात्मा फुले हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत विशेष गुण संपादन करत पुढे जिद्द, आत्मविश्वास व भरपूर मेहनतीच्या जोरावर आपले शिक्षण सुरू ठेवत महाविद्यालयात आपली यशाची पताका अखंडित सुरूच ठेवली.
प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन यशाची पायरी चढतात व तेच लोक इतिहास रचतात. सुरजने कधी लग्नसमारंभात,
कधी शेतात काम करीत आर्थिक हातभार लावला.काम केले आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसमोर एक आदर्श ठेवला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली तो आज देवगाव देवळी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
सूरजने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नियमित सुरू ठेवला कोणताही खंड पडू दिला नाही.समाजकार्य महाविद्यालयात नियमित रनिंग चा सराव केला. इंडियन आर्मीत निवड झाल्याबद्दल
त्याच्या यशाचे गावातील शिक्षणप्रेमी,
मित्रपरिवार, देवगांव देवळी संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षकवृंद यांनी केले आहे.

चौकट
देवगांव देवळी ता.अमळनेर येथे आजतागायत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आता देवगाव देवळी गावात काही शिक्षणप्रेमी व्यक्तीच्या व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत मित्र ,शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष अभ्यासिका वर्ग सुरू केला आहे. अनेक विद्यार्थी नियमित अभ्यास करीत आहेत. भविष्यात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होतील..

अविनाश त्र्यंबक पाटील
लिपिक चोपडा कोर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *