कर्करोगापासून बचाव करण्यासाठी दैनंदिन दक्षता ठेऊन जीवनशैली सुधारली पाहिजे- डॉ.प्रशांत देशमुख
![]()
कर्करोगापासून बचाव करण्यासाठी दैनंदिन दक्षता ठेऊन जीवनशैली सुधारली पाहिजे- डॉ.प्रशांत देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मासिक विचारमंथन मेळाव्यात कर्करोगाविषयी मार्गदर्शन




डॉ.प्रशांत देशमुख व आदर्श पोलिस पाटील सुजय देशमुख यांचा सत्कार
अकोला-वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही व्याधींच्या बाबतीत आजार वाढणार नाहीत यासाठी औषध आहे परंतू त्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा इलाज नाही.म्हणून कर्करोग होऊ नये यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास,धुम्रपान वर्ज्य व कारखान्यातील प्रदुषण आणि रासायनिक द्रव्यापासून नाकावाटे जाणारे विषारी कण तथा वातावरणातील बदल यापासून स्वतःचे बचाव केले पाहिजेत असे मार्गदर्शन कर्करोग औषध संशोधक व मलकापूरच्या डॉ राजेन्द्र गोडे औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य कर्करोगनिदानातील औषधोपचारातील अनेक सन्मानप्राप्त संशोधक डॉ.प्रशांत देशमुख,डोंगरगावकर यांनी केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २५ व्या मासिक विचारमंथन तथा मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख हे होते.यावेळी रिधोरा येथील आदर्श पोलिस पाटील सुजय देशमुख,केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा हा यशस्वी २५ वा विचारमंथन मेळावा होता.यावेळी स़ंजय एम देशमुख यांनी डॉ प्रशांत कृष्णराव देशमुख यांचे २०१४ पासून सुरू झालेले कर्करोगावरील संशोधन कार्य,त्यासाठी प्रयोगशाळा उभारणीसाठी त्यांना केन्द्रशासनाकडून मिळालेली आर्थिक मदत,त्यांच्या उदात्त मानवसेवी कार्याची विद्यापीठे संस्था, आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल व प्राप्त पेटेन्टच्या यशाचा यावेळी गौरव केला .त्यांचा व आपत्ती निवारणासाठी उत्कृष्ट ठरलेल्या रिधोरा येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील श्री सुजय देशमुख यांचाही सत्कार केला .यावेळी निंबा ग्रामस्थांच्या वतीने सुध्दा डॉ.प्रशांत देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबा यांना वंदन करण्यात आले. सौ.जया भारती इंगोले यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी पुष्पराज, गावंडे, उपाध्यक्ष किशोर मानकर,अॕड.नितीन अग्रवाल,अॕड.राजेश जाधव,अंबादास तल्हार, ज्येष्ठ पत्रकार दिपक देशपांडे,सुरेश तिडके,विनोद जोशी,व्ही.एस.देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे,संदिप देशमुख,सतिश देशमुख,अकोला उपाध्यक्ष विवेक मेतकर,सागर लोडम,विजय काटे,देशमुख जागृती मंडळ अध्यक्ष संजय कृ.देशमुख,के.व्ही.देशमुख,

