1 min read

ब्राम्हणशेवगे येथील शेतकरी पुत्राचे क्रांतीकारक संशोधन..

Loading

ब्राम्हणशेवगे येथील शेतकरी पुत्राचे क्रांतीकारक संशोधन..
भारत सरकारच्या नवीन
संशोधन पेटंटच्या जर्नल मध्ये एकाच वेळी दोन संशोधनांचे झाले प्रकाशन.‌
कृषी क्षेत्रात वरदान ठरणारे संशोधन..
प्रकाश पवार यांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मिळणार आशेचा किरण..

जळगाव/प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे सारख्या एका छोट्याशा
गावातून क्रांतीकारक अविष्कार एका कष्टकरी शेतकरी पुत्राने घडवला आहे.
प्रकाश सुनील पवार यांचे दोन नवीन संशोधन पेटेंट भारत सरकारच्या जर्नल मध्ये प्रकाशित झाले. आणि 20 वर्षांसाठी एका अधिकारही प्राप्त झाला आहे.
सदर संशोधन क्रमांक 1) वॉटर कप टू टॅकल ड्रॉट सिचुएशन (पेटेंट अँप्लिकेशन नंबर 202321052775 )
हे संशोधन शेतीसाठी वरदान ठरणार आहे, सदर संशोधनात पिक लागवड साठी तसेच लागवडी पासून साधारणता 2 महिने जरी पिकाला पाणी मिळाले नाही तरी पिक तग धरू शकते असा अविष्कारी फार्मुला अंमलात आणला आहे. निसर्गाच्या, वरुणराजाच्या लहरीपणावर सहज फायदा या संशोधनामुळे शेतकऱ्यांना होणार आहे. या संशोधनामुळे करोडो शेतकऱ्याना मदत होणार आहे. आता पावसाची वाट न बघता लागवड करणे शक्य होईल.
सदर तंत्रज्ञान हे पूर्ण पणे जैविक असून शेतकरी वर्गा साठी खूप स्वस्थही असणार आहे सदर संशोधनाच्या पूर्ण चाचण्या 40 ते 45 डिग्री सेलसिअस मध्ये घेतल्या असून सर्व यशस्वी झाल्या आहेत या शोधामुळे वेळेवर पाऊस न आल्यामुळे होणारे नुकसान पूर्ण पणे टाळता येईल आणि शेतकरी आत्महत्या थांबवता येतील तसेच झाडें लावा झाडें जगवा या योजनेला खूप फायदा होणार आहे. आता अल्पप्रमाणात पाण्याचं वापर करून देखील शेती करणे शक्य होईल असे संशोधक प्रकाश पवार यांचे मत आहे.
संशोधन क्र 2.
कलर चेंगिंग कव्हर टू प्रॉटेक्ट प्रायव्हसी पेटेंट अँप्लिकेशन नंबर (202321051920) हे संशोधन भारतीय संस्कृती तसेच भारतीय व्यक्तीमंत्व वांचे संरक्षण करणारे आहे . लोक पत्रिका बॅनर पिशव्या यांच्यावर देवाचे तसेच मोठमोठ्या व्यतिमत्वाचे (छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,असतील देव- देवतांचे फोटो) छापतात आणि वापर झाल्यानंतर कचऱ्यात फेकून देतात या मुळे मोठा अपमान होतो हे टाळण्यासाठी सदर संशोधनामुळे क्रांती कारक उपाय शोधला आहे.
सदर संशोधणात कव्हर हे ऑटोमॅटिकॅली वापरा नंतर रंग बदलते आणी पात्रिका किंवा बॅनर अदृश्य करते यामुळे होणारा आपल्या हातून नजर चुकीने किंवा अप्रत्यक्ष रित्या होणारी विटंबना, अवमान या अविष्कारी संशोधनामुळे टाळता येणे शक्य होणार आहे.
हे दोन्ही संशोधन देशाच्या संशोधन क्षेत्रात क्रांतीकारक ठरणारे असेच आहेत.शेतकरी पुत्र प्रकाश सुनील पवार हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. वडिल अल्पभूधारक शेतकरी असून आई गावातच आशा सेविका म्हणून सेवा देत आहेत.
आई वडिलांच्या कष्ठाची जाणीव ठेवत घरीच मिळेल त्या साधन सामुग्रीतून मित्रांच्या मदतीने क्रांतीकारक संशोधनांचा शोध लावणे खूप मोठी गोष्ट आहे.शोधामुळे त्याला कॅनडा आणि इंग्लंडमधून नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत परंतु देशातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी नाकारली.
त्यांचे संशोधन गावासाठी अभिमानाचे व संपुर्ण देशासाठी क्रांतीकारक ठरणारे असेच आहे. प्रकाश पवार यांचे या संशोधनामुळे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *