अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत १०० गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
समाज संघटन काळाची गरज : राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील!
![]()


अखिल भारतीय माळी महासंघातर्फे जैताणेत १०० गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
समाज संघटन काळाची गरज : राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील!
(प्रा.भगवान जगदाळे)
जैताणे ता.साक्री (धुळे) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे माळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय गुणगौरव रविवारी (ता.१७) सकाळी अकराला जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात माळी समाजाच्या सुमारे शंभरावर गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
समाज संघटन ही काळजी गरज असून पक्षभेद, मतभेद, गटतट, हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन आपल्या माणसांना मोठे केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले. मानद अध्यक्ष ऍड.संभाजीराव पगारे, पुष्पलता पगारे, नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, राष्ट्रीय सचिव विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष आर.के. माळी, विभागीय संघटक काशिनाथ माळी, धुळे महानगराध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे, महानगर सचिव ज्ञानेश्वर माळी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, शिरपूर तालुकाध्यक्ष सुनील माळी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रशांत महाले, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, पत्रकार सुभाष जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, माजी सरपंच संजय खैरनार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील, महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
चिमुकल्या चैतन्या सूर्यवंशीने योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर अनुराग जगदाळेने गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. गुणवंत विद्यार्थ्यांना माळी महासंघातर्फे आकर्षक प्रमाणपत्रे व फोल्डर/फाईल भेट म्हणून देण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था व आईभवानी महिला पतसंस्था यांच्यातर्फेही प्रमुख मान्यवरांचा सत्कार झाला. ग्रंथालय संघाचे राज्य कार्यवाह अनिल सोनवणे यांनी मान्यवरांना प्रा.हरी नरकेलिखित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक भेट दिले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकारिणीचा विस्तारही करण्यात आला. त्यात माजी सरपंच संजय खैरनार यांची नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. साक्री मंडळाध्यक्षपदी तुकाराम खलाणे, सचिवपदी अमोल जाधव, युवा अध्यक्षपदी नरेंद्र सूर्यवंशी, जैताणे शहराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी रवींद्र देवरे, सचिवपदी श्रीकांत खलाणे, तर खजिनदारपदी सागर जगदाळे यांची नियुक्तीपत्रे देऊन नेमणूक करण्यात आली.
मानद अध्यक्ष ऍड.संभाजीराव पगारे, राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील, विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, काशिनाथ माळी, ज्ञानेश्वर माळी, सुभाष जगताप, संजय खैरनार, राजेश बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.भगवान जगदाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ.मनोज भागवत यांनी बक्षिसांचे वाचन केले. अनिल सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ऍड.विकास माळी, सुशील जगदाळे, विजय सूर्यवंशी यांनी नावनोंदणीसाठी सहकार्य केले. नंदकुमार जाधव, भूषण भदाणे, दीपक सूर्यवंशी, उपसरपंच रवींद्र देवरे, श्रीकांत खलाणे, सागर जगदाळे, तुकाराम खलाणे, अमोल जाधव, नरेंद्र सूर्यवंशी, भारत जाधव, राजनारायण जगदाळे, किशोर बागुल, कर्मचारी आघाडीचे कार्याध्यक्ष राजेंद्र माळी, पिंपळनेर मंडळाचे युवा अध्यक्ष धनंजय घरटे, माजी उपसरपंच नवल खैरनार, पंकज सोनवणे, तुषार खैरनार, पंढरीनाथ सोनवणे, रवींद्र जाधव, गोकुळ देवरे, दुल्लभ जाधव, विजय भदाणे, बालू जाधव, अनिल सोनवणे, भगवान जगदाळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. जैताणे माळी समाज पंच मंडळासह समाजातील दात्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. प्रा.हरी नरके यांना यावेळी सामूहिक श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

