राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील.
![]()


राष्ट्रनिर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व — प्रा.डॉ.डिंपल पाटील.
जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिनाच्या निमित्ताने कला मंडळाच्यावतीने हिंदी पखवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय हिंदी दिनाचे औचित्य साधून दि.११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान निबंध लेखन, वकृत्व, गीत गायन व प्रश्न उत्तरे,कथाकथन व हिंदी अनुवाद लेखन अशा नानाविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना एसएनडीटी महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.डिंपल पाटील यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा.डॉ.डिंपल पाटील यांनी हिंदी भाषेची ओळख व भाषेचा पूर्व इतिहास विशद करून राष्ट्रभाषा हिंदी व राजभाषा हिंदी यातील फरक समजावून सांगितला.हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की,राष्ट्र निर्मितीमध्ये हिंदी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे होत्या. पर्यवेक्षक प्रा. आर. बी.ठाकरे, विज्ञान शाखा समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय हिंदी विषय शिक्षिका प्रा.ज्योती मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.१२वी कला शाखेची विद्यार्थिनी गीता पंडित व प्रा.ज्योती सोनवणे यांनी तर ११वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सिद्धांत नन्नवरेने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला मंडळाच्या सर्व सदस्य प्राध्यापक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.

