नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन
[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर
![]()
नाशिक येथे २४ सप्टेंबरला सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन
[अधिवेशनात होणार क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे मंथन व भविष्यकालीन दिशा दिग्दर्शन आणि प्रा.हरी नरके यांच्या प्रेरक कार्याचा कृतज्ञ जागर
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सत्यशोधक नगरी,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड,जेजुरकर मळा,नाशिक येथे संपन्न होणार आहे.या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन सत्यशोधक राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे.समारोप सत्रास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब देऊन मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक उत्तम कांबळे उद्बोधन करणार असून हरी नरकेंच्या सुकन्या प्रमिती नरके उपस्थित राहणार आहेत.एकूण ३ सत्रातील अधिवेशनाचा सुनियोजीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे
अधिवेशनाचा शुभारंभ –
ध्वजारोहण : – सकाळी ९.१५ वाजता सत्यशोधक समाजाच्या झेंड्याच्या ध्वजारोहण


उद्घाटन :- सकाळी ९.३० वा शुभहस्ते – मा.छत्रपती संभाजीराजे ( सत्यशोधक राजर्षी शाहू महाराजांचे वंशज,कोल्हापूर ), स्वागताध्यक्ष मा.विश्वासराव मोरे ( सत्यशोधक गणपत दादा मोरे यांचे नातू तथा उपाध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज ) प्रमुख अतिथी – मा.आ.वसंतराव गिते (नाशिक ), डॉ.डि.एल.कराड ( केंद्रिय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष,सिटू ),डॉ.भुषण कर्डीले ( माजी सदस्य,राज्य मागास आयोग ), मा. प्रा.कविताताई कर्डक ( महानगराध्यक्ष, अ.भा.म. फुले समता परिषद,नाशिक ), मा. प्रबोधनकार तथा कोकणचे गाडगेबाबा मारोती काका जोयशी ( रत्नागिरी )
प्रथम सत्र ११.३० ते
ते १२.३०
विषय :- ‘ संशोधकांनी सत्यशोधक प्रा.हरी नरके यांचे कडून काय प्रेरणा घ्यावी ?‘
निमंत्रित मान्यवर – मा.ॲडव्होकेट सुभाष निकम (माजी सचिव, अखिल भारतीय सत्यशोधक समाज बीड ), मा.श्रीराम मंडळ मंडलिक ( सामाजिक कार्यकर्ता,नाशिक ),मा. बाजीराव अण्णा तिडके (ज्येष्ठ समाजसेवक,नाशिक), मा.सत्यशोधक सुरेश दादा पाटील (ज्येष्ठ पदाधिकारी,महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना ठाणे ),मनोगत- कु.प्रमिती हरी नरके उद्बोधन – मा.उत्तम कांबळे ( माजी अध्यक्ष ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन )
द्वितीय सत्र -१२.३० ते २.०
विषय :- सत्यशोधक समाजाची चळवळ काळाची गरज
निमंत्रित मान्यवर :-
ॲड.धनराज वंजारी ( माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई ), मा.उत्तम नाना पाटील ( दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे नातू ), मा.मनोजभाऊ घोडके ( जिल्हाध्यक्ष,अ.भा.म.फुले समता परिषद,छ. संभाजीनगर ), मा.करुणासागर पगारे ( सामाजिक कार्यकर्ते, नाशिक),वक्ते : प्रा.डॉ.आर.जी.भोंग ( नाशिक ) अध्यक्ष :- मा.डॉ.राजेंद्र कुंभार , कोल्हापुर ( माजी सचिव,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र व साधने समिती )
*तृतीय सत्र – दु.३ ते ४.३०
*विषय – वर्तमानातील शेतकरी,शैक्षणिक घोरण व त्यात सत्यशोधक चळवळीची भुमिका*
निमंत्रित मान्यवर – मा.डॉ. दत्ताजीराव जाधव ( सातारा ), बापूसो.सुरेश महाजन (माजी सभापती कृ. उ.बा.समिती, दोंडाईचा ),मा.प्रकाशभाऊ लोंढे (माजी नगरसेवक,नाशिक ), वक्ते : मा.प्रा.सुनील देवरे ,रायगड ( सत्यशोधक समाज संघ ), मा.विश्वासराव पाटील, अमळनेर,जि.जळगाव ( सत्यशोधक समाज संघ ) अध्यक्ष – मा.जी.ए.उगले, पैठण ( सत्यशोधक चळवळीचे संशोधक, विचारवंत व लेखक )
समारोप सत्र:-
प्रमुख उपस्थिती मा.नामदार छगन भुजबळ साहेब (अन्न,नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण ) व (अध्यक्ष : अ.भा.महात्मा फुले समता परिषद ) प्रमुख अतिथी – मा.आमदार सुधीर तांबे ( पदवीधर मतदार संघ ), मा.समाधान जेजुरकर ( सरचिटणीस,अ.भा.म.फुले समता परिषद ,महाराष्ट्र )
दि .२३ सप्टेंबर रोजी महत्वाचे निवेदन अधिवेशाच्या औचित्याने दिले जाईल.अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला शनिवारी कार्यक्रम स्थळी
विशेष एकपात्री प्रयोगः – ‘ मी जोतीराव फुले बोलतोय ‘ – नटश्रेष्ठ कुमार आहेर, वेळ : संध्याकाळी ७ वाजता
या ऐतिहासिक व संस्मरणीय अधिवेशनास शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर विचार धारेचे विचारवंत,अभ्यासक, युवा कार्यकर्ता वर्ग,विद्यार्थी – विद्यार्थीनी,सत्यशोधक समाज संघाच्या समस्त कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून समविचारी संघटना आणि आप्तेष्टांसह आवर्जून उपस्थित राहून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिवेशनाचे कार्याध्यक्ष आप्पा जगताप, संयोजक अशोक सोनवणे,सहसंयोजक भाऊसाहेब जाधव,संमेलनाचे निमंत्रक संस्थापक राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार, संस्थापक राज्य सचिव सुरेश झाल्टे, सहसचिव सुनील देवरे,खजिनदार नरेंद्र जाधव अधिवेशनाच्या प्रसिद्धी समितीचे सदस्य विजय लुल्हे,जळगाव व प्रमोद पाटील,धरणगाव,संयोजन समिती सदस्य रविंद्र तितरे ,जळगाव यांनी आवाहन केले आहे.

