अतिरिक्त ठरवितांना कुणावरही अन्याय होणार नाही,अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर ठाणे रायगड पालघर शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश
![]()


अतिरिक्त ठरवितांना कुणावरही अन्याय होणार नाही,अनिल बोरनारे यांच्या तक्रारीनंतर ठाणे रायगड पालघर शिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांना आदेश
ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) शिक्षकांना सरप्लस ठरवितांना निकषांचे पालन करावे कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश ठाणे रायगड व पालघर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिले आहेत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे नियमांची पायमल्ली होत असल्याची लेखी तक्रार दिली होती बोरनारे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी शाळांना आदेश दिले.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळेत शिक्षकांना अतिरिक्त ठरवितांना अतिरिक्त ठरविण्याबाबतचे निकष पाळले जात नसल्याच्या तक्रारी अनिल बोरनारे यांच्याकडे शिक्षकांनी केल्या होत्या. यावर बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकाना लिहिलेल्या पत्रात अतिरिक्त शिक्षकाचे नाव परस्पर शिक्षण विभागाकडे पाठविण्याआधी संबंधित शिक्षकाला लेखी कळविण्यात यावे, अतिरिक्त ठरवितांना कोणत्या नियमाने अतिरिक्त ठरविण्यात आले याचा लेखी पत्रात उल्लेख करायला हवा यावर हरकत असल्यास शिक्षकाला सात दिवसाचा अवधी देण्यात यावा त्यासाठी शिक्षकाला सेवाजेष्ठता यादी पुरविण्यात यावी तसेच शालास्तरावर शिक्षकाचे समाधान न झाल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पारदर्शी सुनावणी घेण्यात यावी तो पर्यंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करू नये अशी मागणी निवेदनात केली होती.
या सर्व मागण्या मान्य झाल्याने अन्याय झालेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

