प्रताप महाविद्यालयात अमृतकलश संकलनाचे उदघाटन
![]()

प्रताप महाविद्यालयात अमृतकलश संकलनाचे उदघाटन
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत ‘अमृतकलश’ संकलनाचे उद्घाटन खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे व प्राचार्य डॉ. ए. बी.जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,
“भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार “मेरी माटी मेरा देश” या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याअनुषंगाने आपण सर्वांनी या उपक्रमाला प्रतिसाद देऊया असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत पवार यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या एका हातात माती घेऊन त्याचा सेल्फी काढून दिलेल्या लिंकवर अपलोड करण्याचे आवाहन व मार्गदर्शन केले.
या याप्रसंगी सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जे. बी. पटवर्धन, प्रा. डॉ. डी. आर. चौधरी, डॉ. नलिनी पाटील, डॉ. कैलास निळे, डॉ. दीपक पाटील, डॉ.आर. एस. मराठे, डॉ. वंदना भामरे, डॉ. अमित पाटील, डॉ. सचिन पाटील, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. रागिनी सैंदाणे, आदी. प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

