प्रताप महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा
![]()

प्रताप महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा
अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि.१६ रोजी भूगोल विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.
“जागतिक ओझोन दिवस” निमित्ताने प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एम. गावीत व अध्यक्षीय मनोगत भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एस. निळे यांनी केले. प्रा. डॉ. एम. के. महाजन यांनी ओझोन दिवसानिमित्त अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
यावेळी प्रा. डॉ. पी. एस. चौधरी, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रवीण धनगर, महेश राजपूत व भूगोल विभागातील पदवी स्तरावरील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. अमित सिरसाठ यांनी मानले.

