आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा..
![]()

आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा..
भारत हा कृषिप्रधान देश आहे.देशातील बहुतेक लोक हे शेतकरी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये बैलपोळा हा शेतकऱ्यांचा मोठा सण मानला जातो.या पार्श्वभूमीवर
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या आदेशान्वये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आर्मी स्कूल मध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यांनाही या सणाची आपसूकच ओढ असते.त्यामुळे त्यांना या सणाचा आनंद घेता यावा. यासाठी नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या मालकीची बैल जोडी आणून त्यांचे पूजन प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. रीतीप्रमाणे बैलांना खाऊ-पिऊ घातले गेले,शिंगांना रंगरंगोटी करण्यात आली.काही विद्यार्थ्यांनी बैल पळवून आनंद घेतला.
खऱ्या अर्थाने सांस्कृतिक परंपरांची जोपासणूक या माध्यमातून आर्मी स्कूल मध्ये करण्यात आली. यावेळी विद्यार्थांसोबत प्राचार्य पी.एम. कोळी,संतोष पवार, शिवाजी पाटील,साळुंखे सर,हेमंत मोरे,मिलिंद बोरसे,चेतन महाजन आदी उपस्थित होते.

