1 min read

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —-अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन

Loading

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —-

अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन

अमळनेर प्रतिनिधी

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे व ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज ता.१५ रोजी महात्मा फुले समता परिषदेने तहसील कार्यालय येथे आंदोलन करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री यांच्यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडेकर यांना निवेदन दिले.
जालना प्रकरणापासून मराठा समाज हा ओ. बी. सी.मधुन आरक्षण देण्याची मागणी करीत आहे. कोणत्याही मागासवर्गीय आयोगाचा संदर्भ नसतांना तसेच सर्व्हे झालेला नसतांना निजामशाहीतील दाखले प्रमाणपत्राचा हवाला देत आहेत. बंद, जाळपोळ सारखे प्रकार होत आहेत. मराठा समाजाच्या दडपणाला शासनाने बळी पडू नये. ओ.बी.सी. समाज हा ५२% पेक्षा जास्त असून आरक्षण केवळ २७% आहे. तेही पुर्ण मिळत नाही. त्यात प्रगत ‘मराठा समाज जर ओ. बी. सी. त आला तर काहीच हाती मिळणार नाही.

मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे ——
मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु आर्थिक व सामाजिक व राजकिय दृष्ट्या गरीब व वंचित असलेला ओ.बी.सी. समाज वंचित राहील म्हणून सकारने वरील दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण न करता जातीय सलोखा कायम रहावा या करिता ओ. बी. सी. च्या आरक्षणाला धक्का न लावता
मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसेच बिहार या राज्याच्या धर्तीवर आधारित महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करावी.

ओबीसी समाज आक्रमक होईल ——
जर याचा यथायोग्य शासनाने विचार केला नाही तर ओ.बी.सी. समाज आक्रमक
होऊन रस्त्यावर आंदोलन करील व यास शासन जबाबदार राहील असा इशारा समता परिषदेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन,दहिवद चे माजी उपसरपंच प्रवीण माळी, भिलाली येथील माजी सरपंच दिनेश माळी, समाज समाजसेवक बापू जुलाल पाटील, परिश्रम विद्यालयाचे चेअरमन योगेश महाजन, संत सावता माळी सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रवीण बारकू महाजन, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुनील शिंपी, परिश्रम शाळेची मुख्याध्यापक मनिष जाधव सर समता परिषदेचे पदाधिकारी, समता सैनिक यांच्यासह ओबीसी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *