1 min read

जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

Loading


जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव -पोषण पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत पालक आणि स्वयंपाकी -मदतनीस यांच्यासाठी जळगाव तालुका स्तरीय तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन दि 15 सप्टेंबर 2023 रोजी अनुभूती शाळेत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी खलील शेख आणि प्रभारी अधीक्षक विजय पवार उपस्थित होते. परीक्षक म्हणून शैला चौधरी व नीता वानखेडकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुणाल पवार सर यांनी केले.प्रास्ताविक अधीक्षक विजय पवार यांनी केले. गटशिक्षणाधिकारी खलील शेख,माता पालक सविता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामीण व शहरी शाळेतील पालक, स्वयंपाकी, मदतनीस यांनी विविध तृण धान्यापासून तयार केलेल्या पदार्थ्यांचे सादरीकरण केले.केंद्र प्रमुख वैशाली बाविस्कर, विनोद चव्हाण, अजय शिरसाठ यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.उपस्थितांनी पोषण शपथ घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
पाक कृती स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
प्रथम -करिष्मा रोहिदास सपकाळे जि प शाळा किनोद
द्वितीय -सविता लक्ष्मीकांत पाटील प वि पाटील विद्या मंदिर जळगाव
तृतीय -रेखा दिलीप सोनवणे जि प शाळा पाथरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *