1 min read

आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन..

Loading

आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन..

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेज,अमळनेर येथे प्राचार्य पी.एम. कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेत ‘राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान प्रतियोगिता 2023’ चे आयोजन करण्यात आले.यात दोन गट करण्यात आले.सहावी ते सातवी चा एक लहान गट होता.तर आठवी ते दहावी हा मोठा गट करण्यात आला होता. यात लहान गटात एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तर मोठ्या गटात एकूण 116 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हिंदी विषय शिक्षक टी.के.पावरा,वाय.के.भोई,डी.के.पारधी यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर स्पर्धेचे आयोजन केले.स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *