1 min read

आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा.

Loading

आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा.

अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर हा ‘हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.एम.कोळी होते.सुभेदार मेजर श्रीराम पाटील व ज्येष्ठ गणित शिक्षक बी डी पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून होते.तसेच प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे हिंदी शिक्षक वाय.के.भोई व डी.केे.पारधी होते.सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.इयत्ता दहावीचे विद्यार्थी दर्शन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मयूर पाटील यांनी हिंदी भाषेतून मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्त्यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले.’हिंदी भाषेचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे.’ असे उद्गार अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी.एम.कोळी यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या प्रणव आर्मी याने केले. तर आभार संदेश कोकणी याने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *