1 min read

महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट.

Loading

महिला समूह गट कळमसरे यांच्याकडून कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्या सप्रेम भेट.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून महिला समूह गट कळमसरे यांच्यामार्फत कळमसरे ग्रामपंचायतला 30 खुर्च्या भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासले आहे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सविस्तर माहिती अशी कि गावातील महिला समूह गटाच्या मॅनेजर श्रीमती अर्चना महाजन यांच्या सौजन्याने कळमसरे ग्रामपंचायतीस 30 खुर्च्यांच्या सेट सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. यावेळी सरपंच श्री.जगदीश निकम, उपसरपंच श्री पिंटूभाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रमिला चौधरी, मीराबाई बडगुजर, सौ मीना कुंभार, सौ.लताबाई भिल, श्रीमती रेश्माबाई चौधरी, श्री गणेश चौधरी, श्री संदीप पाटील, श्री दिनकर चव्हाण, सौ पल्लवी चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील तसेच तसेच आयडीएफसी व एसबीआय बँकेच्या अमळनेर शाखेच्या भारती भोई, एकता नेरकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *