1 min read

परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावी
डॉ.मिलिंद बागुल

Loading

परंपरेच्या जोखडातून मुक्त होत स्त्रियांनी विज्ञानाची कास धरावी
डॉ.मिलिंद बागुल
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत प्रगतीच्या पाऊलखुणा स्पष्टपणे जाणवत असताना स्त्रियांनी परंपरेच्या जोखडातून मुक्त होत विज्ञानाची कास धरावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची सुद्धा प्रगती घडवून आणावी असे मत सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी आय. एम. ए. हॉल धुळे येथे सुनंदा ढिवरे निकम लिखित सुपूर्द कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले स्त्रियांनी आपल्या जीवनाला घालून दिलेली चौकट छेदत निसर्गदत्त अधिकारांचा भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा आत्मसन्मानाचा स्वाभिमानाचा विचार करीत आपल्या जीवनमानाला उंचावण्यासाठी पुढच्या पिढीला विज्ञानाचा दृष्टिकोन स्पष्टपणे देण्यासाठी आपला आत्माभिमान जागृत करून समाज मनाला नवी दृष्टी नव्या संदेश देण्याचा प्रयत्न करावा ज्यातून आपल्या देशाला देशहिताला प्राधान्य दिले जाईल आणि त्यातून स्रीयांची प्रगती निश्चितपणे साधली जाईल असे विचार त्यांनी याप्रसंगी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक, कवी गायक भास्कर अमृतसागर होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, फुले, शाहू ,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणाला तिच्या प्रगतीला आजही परंपरा, रूढी आडव्या येतात आणि त्यांच्या जीवनमानात अडथळे निर्माण करत त्यांचं जगणं कठीण केले जाते. यासाठी स्त्रियांनी आपले स्वतःचे आत्मबल शिक्षणाच्या माध्यमातून प्रगत करत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश मोरे यांनी केले. याप्रसंगी सुनंदा ढिवरे निकम यांनी आपल्या मनोगतात प्राप्त परिस्थितीला तोंड देत संघर्ष करीत महापुरुषांच्या विचार वाटेला आत्मसात करीत कुटुंबाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत राहिली स्त्रियांना आपल्या स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जागृत करणे काळाची गरज असून त्यासाठी दुःख उगाळत बसण्यापेक्षा दुःखावर मात करण्याची वाट शिक्षणातून, महापुरुषांच्या विचारातून मिळत असल्याचे मत त्यांनी मांडले.विचारमंचावर बापू शिरसाठ,सावित्री धिवरे ,सुनंदा वाडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी मंगला जोशी, सुरेखा वळवी,मिलिंद निकम,स्वाती बोरसे, यांनी मनोगत व्यक्त केली.सूत्रसंचालन कल्याणी कच्छवा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *