1 min read

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची २४ सप्टेंबरला कार्यकारिणीची सभा

सर्व जिल्हा/महानगर अध्यक्ष -सचिव, तसेच सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन कार्यकारिणीची सभा रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता, *जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी, ६, अजय कॉलनी, रिंग रोड, जिल्हा बँकेच्या समोर, हरिष स्विट मार्टच्या मागे, जळगाव येथे खालील विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.
सभेतील विषय:-
(1)मागील सभेचे इतिवृत्त वाचन
(2)शासनाच्या विविध निर्णयांसंबंधी विचार विनिमय करणे
*राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षक पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरणे.
*जि. प.शाळा उद्योग समूहास दत्तक देणे.
*अर्जित रजेचे रोखीकरण व वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचे लाभ प्रश्नांकित झाल्याबद्दल…
(3)जिल्हा संघटनांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या विविध सेवाविषयक प्रश्नासंबंधी विचारविनिमय करणे.
(4)शासन निर्णय व अन्य प्रलंबित प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेणे.
(5)महाराष्ट्र फेडरेशन निवडणुकीसाठी “त्रि सदस्य निवडणूक समिती” गठीत करणे
(6)आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर विचार विनिमय करणे.
यासाठी सदर सभेप्रसंगी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित रहावे असे संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सचीव शालीग्राम भिरूड यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *