भावार्थ van पुस्तकं आणि बरंच काही ..लेखकविजय सुपडू लुल्हे
( निवृत्त प्राथमिक शिक्षक )
![]()



भावार्थ van पुस्तकं आणि बरंच काही ….
विजय सुपडू लुल्हे
( निवृत्त प्राथमिक शिक्षक )
- संस्थापक,जिल्हा प्रमुख
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव - कार्यकारी सदस्य
महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणे
शाखा – जळगाव
” पुस्तकं सभ्यता आणि संस्कृतीचे वाहक आहेत.पुस्तकांशिवाय इतिहास निःशब्द आहे, साहित्य मूक आहे,विज्ञान अपंग आहे,विचार आणि कल्पना शक्ती स्थिर आहेत.पुस्तके वैचारिक क्रांती आणि पुरोगामी समाज परिवर्तनाची इंजिन आहेत.अमर्याद वैश्विक ज्ञानाच्या खिडक्या आणि काळ सागरातील कालातीत प्रकाशस्तंभ आहेत.” बारबरा डब्ल्यू तुचमन या ग्रंथप्रेमी विचारवंताने मानवी जीवनातील पुस्तकांचे महत्त्व सर्वांर्थाने अधोरेखित केले आहे.
‘ आवड आहे पण सवड नाही ‘ ही आयुष्यात प्रत्येकाचे रडगाणे ! पण…
एखादा चमत्कार घडावा आणि तुमच्या शहरात, गावात, शाळेत इच्छा – आकांक्षा नुसार दर्जेदार पुस्तकांची व्हॅन तुमच्यासमोर दिसली तर…..त्या अनपेक्षित आनंदाची सुवर्णसंधी व्रतस्थ साहित्यिक,व्यासंगी ग्रंथप्रेमी,ज्ञानतृषार्त विद्यार्थी व सुजाण पालक माता भगिनी वाया घालवतील का ?
चिपळूण येथील TWJ Foundation संचलित भावार्थ van पुस्तकं आणि बरंच काही … या उपक्रमांतर्गत नामवंत लेखकांची 86 प्रकाशनांची विविध विषयांवरील 6000 हून अधिक मराठी पुस्तके या योजनेत उपलब्ध आहेत.सर्व ग्रंथप्रेमींना पुस्तकांचा खजिना प्रत्यक्ष मनसोक्त हाताळण्याचा तसेच हवा तेवढा वेळ विनामूल्य वाचनानंद सन्मानपूर्वक घेता येणार आहे. TWJ FOUNDATAION – THE SOCIAL REFORMS या संस्थेची स्थापना मा.दादासाहेब समिरजी नार्वेकर व सौ.नेहाताई नार्वेकर यांच्या मागदर्शनान्वये दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरदजी पोंक्षे यांच्या शुभहस्ते चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.पुणे येथे भावार्थ उपक्रमाचा शुभारंभ 14 जून 2022 रोजी मा.जितेंद्र जोशी यांच्या हस्ते झाला.भावार्थ पुस्तक व्हॅन ग्रंथसेवेचा शुभारंभ दि.17 जून 2022 रोजी कवीवर्य वैभव जोशी यांच्या शुभहस्ते झाला.मराठी माणसांना साहित्य,कला,संगीत व संस्कृतीने एकत्र बांधण्याचा उपक्रम म्हणजे ‘ भावार्थ ‘ नित्यनुतन कालसुसंगत उदिष्टांन्वये सर्वस्पर्शी उपक्रम , कौशल्यपूर्वक व्यवस्थापन,सेवाभावी , शिस्तबद्ध कार्यवाहीमुळे अल्पावधीत संस्थेचा विस्तार राज्यस्तरावर पोहोचला.भावार्थ उपक्रमांतर्गत पुणे कार्यालयात विविध विषयांवरील 6000 पेक्षा अधिक तर फिरत्या भावार्थ पुस्तक व्हॅन मध्ये 3500 हून जास्त दर्जेदार मराठी पुस्तकं मोफत वाचनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध असतात.भावार्थ उपक्रमांतर्गत प्रत्येक लहान थोर वाचकांची विषय निहाय व वयोगटानुसार आवडीच्या विषयांची नोंद घेण्याचे अभिनव सर्वेक्षण करण्यात येत आहे असे भावार्थ पुस्तक व्हॅनच्या कार्यवाहकांनी सांगितले.
जळगाव शहरात भावार्थ पुस्तक व्हॅन गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 पासून आपल्या सेवेत असून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये : –
- मराठी वाचन संस्कृती जोपासणे आणि संवर्धित करणे. * पुस्तक प्रदर्शनाद्वारे बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचणे. * भावार्थ कॉर्नर * खास डिझाईन केलेले कॉफी मग * गिफ्ट कार्ड आणि मेंबरशिप कार्ड * भावार्थ वाचनालय * सुसज्ज भावार्थ व्हॅन मधून आपल्या दारी विविध दर्जेदार मराठी ग्रंथ संपदा पोहोचविणे.
वाचकांशी ऋणानुबंध दृढीकरणासाठी विविध माध्यमे :-
1 ) इन्स्टाग्राम – Instagram 2 ) भावार्थ van Instagram 3 ) भावार्थ website 4 ) भावार्थ कट्टा 5 ) Twitter 6 ) Face book 7 ) You Tube 8 ) कला आरंभ
वाचकांची अभिरुची बहुआयामी अन् प्रगल्भ होण्यासाठी विविध क्षेत्रातील यशवंत प्रेरणादायी नामवंतांचे उपक्रम फाऊंडेशन तर्फे संस्थेच्या सुसज्ज सोयींनी युक्त भावार्थ दालनात ( 1200 स्केअर फूट ) राबविले जातात.
आजतागायत भावार्थच्या व्यासपिठावर सन्मानित झालेले सुप्रसिद्ध सिलेब्रेटी: –
लेखक :- पानिपतकार विश्वास पाटील, अच्युत गोडबोले, मंगला गोडबोले, लेखक दिग्दर्शक – परेश मोकाशी, अभिनेते :- वामन केंद्रे ( माजी संचालक, नॅशनल स्कुल ऑफ ड्रॉमा ), स्पृहा जोशी, शिव ठाकरे, सुयश टिळक संगीतकार – राहुल देशपांडे आणि अन्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर
उपक्रम : –
क्रिक कट्टा :- मान्यवरांच्या मुलाखती
भावार्थ कट्टा:- वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणारांना
हक्काचे व्यासपीठ
भावार्थ मैफल :- रसिक श्रोत्यांसाठी
शब्दमंच :- नवोदित लेखक आणि कवींसाठी हक्काचे व्यासपीठ
शब्दयात्री:- दिग्गज मराठी साहित्यिकांच्या मुलाखती
भावार्थ मोफत वाचनालय
मोटीव्हेशन:- दर्जेदार, पुरस्कृत पुस्तकांचा परिचय व समिक्षण
कला आरंभ:- चिपळूण येथे नुकतेच ‘ कलारंभ ‘ या कला विभागात प्रत्येक कलाशैलीनुसार कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कलाक्षेत्रात पुढील व्यावसायिक सेवा देत आहेत :- 1) कॉम्पिटिशन 2 ) कला प्रदर्शन 3 ) कमर्शिअल प्रोजेक्टस 4 ) आर्ट वर्कशॉप इनक्लुडिंग 5 ) क्राफ्ट वर्क 6 ) कला साहित्याची उपलब्धता
अन्य प्रेरक उपक्रम :-
1 ) प्रश्नोत्तरे :- वाचकांच्या ज्ञानाला उजाळा मिळावा म्हणून ऑन लाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा व भरघोस पारितोषिके
2 ) दिनविशेष शुभेच्छा : – विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्मरणीय महानुभवांचे प्रेरणादायी स्मरण व प्रसंगोचित ऐतिहासिक माहितीपुर्ण निरंतर शुभेच्छा.
दिनविशेष औचित्याने पुस्तक खरेदीत 15 % टक्के विशेष सवलत योजना
3 ) फलक लेखन :-
विविध क्षेत्रातील थोरपुरुषांच्या प्रेरणादायी विचारांचे फलक लेखन सोबत – इंग्रजी शब्दांचे मराठी भाषांतर
📚 भावार्थ कॉर्नर 📚
आपल्या शाळा व महाविद्यालयाच्या कार्यालयात,वाचनालयात, प्रतिक्षालयात,रुग्णालयात येणाऱ्या सुजाण लोकांचा प्रतिक्षेचा वेळ सत्कारणी लावण्याच्या सद्हेतूने त्यांच्या हाती द्या भावार्थची पुढील बौद्धीक भेट द्या. 👉🏻
संच क्र.एक – 25000 रु
[ 11 नियतकालिके – 132 अंक ]
1 ) Fortune India 2 ) Vogue 3 ) Diabetic health 4 ) Digit
5 ) Reader Digest English 6 ) Autocar India 7 ) Hello
8 ) रूपवाणी 9 ) अनुभव 10 ) छात्र प्रबोधन 11 ) साधना
संच क्र .दोन -25000 रु
[ 10 नियतकालिके – 177 अंक ]
1 ) Fortune india 2 ) Forbes india 3 ) Outlook business 4 ) Dalal street Magazine 5 ) Digit 6 ) Autocar india 7 ) Architecture + Design
8 ) Hello 9 ) अनुभव 10 ) रुपवाणी
संच क्र.तीन – 25000 रु
1 ) Fortune india 2 ) vogue 3 ) Diabetic Health 4 ) Digit
5 ) Reader Diagest English 6 ) Autocar india 7 ) Architecture + Design 8 ) Outlook traveller 9 ) Hello
[ टिपः- १०% सवलतीच्या दरात वरील सर्व अंक दर महिना घरपोच मिळतील तिन्ही संचांचे शुल्क GST वगळून आहेत ]
सदिच्छा भेट म्हणून भावार्थ टी – शर्ट
टिपः-उपरोक्त तिन्ही संचांचे शुल्क GST वगळून आहे.
पुस्तक दान – ‘ भावार्थ ‘ वाचनालय - आपली जुनी वाचून झालेली हाताळण्या योग्य पुस्तकं इतरांसाठी उपलब्ध करू भावार्थ वाचनालयात
- दुर्गम भागातील गावांमध्ये नागरिकांसाठी आणि शाळेसाठी भावार्थ मोफत वाचनालय
- आपण देऊ शकता मराठी हिंदी,इंग्रजी,भाषेतील पुस्तके देणगी स्वरूपात
आजतागायत 9 मोफत वाचनायात प्रत्येकी सुमारे 150 ते 200 ग्रंथसंपदा उपलब्ध करून वाचनालयात फाऊंडेशच्या पर्यवेक्षण व मार्गदर्शनात स्थानिक व्यवस्थापनेच्या जबाबदारीवर सुरु असून वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.परिणामी यातून सुजाण नागरीक व ध्येयवादी विद्यार्थी घडत असल्याने सानंद उद्दीष्टपूर्ती होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात जास्त प्रतिसाद मिळाला .
Intership Program
1️⃣ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भावार्थ सोबत जोडले जाण्याची सुवर्णसंधी
2️⃣आठवड्यातून दहा तास तीन महिन्यांकरता आपण भावार्थ मध्ये येऊन आमच्या सोबत मराठी साहित्य प्रसार करू शकता
3️⃣ विविध कार्यक्रमांसाठीचे नियोजन कौशल्य आत्मसात करता येईल.
4️⃣ हा Internship program तीन महिन्यांचा पूर्ण केल्यावर फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.
ग्रंथप्रेमी व साहित्यिकांनी गुणवत्तापूर्ण कामकाज पाहण्यासाठी चिपळूण मुख्य शाखा व पुण्याला आवश्यक भेट द्यावी ही नम्र विनंती.
TWJ च्या जीवनाभिमुख शाखा : – 1) I .T. SOLUTIONS 2 ) EVENTS 3 ) MEDIA 4 ) HOSPITALITY 5 )
INFRASTRUCTURE
6 ) LOGISTICS 7 ) LEARNING SOLUTIONS 8 ) BUSINESS CONSULTANCY 9 )
TWJ FOUNDATION
TWJ ची घोडदौड आता समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक सक्षमतेकडे प्रवास करावा या व्यापक आणि उदात्त ध्येय धोरणांसह वायू वेगाने कोकण,विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत धडकली आहे.
TWJ FOUNDATION
THE SOCIAL REFORMS शाखांचा
गौरवास्पद राज्यस्तरीय विस्तार पुढील प्रमाणे : –
- चिपळूण * पुणे * ठाणे * खारघर * विरार * जळगाव * रत्नागिरी * माणगाव
- लोणेरे * छत्रपती संभाजी नगर * सांगली * शृंगारतळी * यवतमाळ * कोल्हापूर
* नागपूर
ग्रंथांचे मूल्य रत्नांपेक्षा अधिक आहे कारण पुस्तके अंतःकरणाला प्रज्वलित करून सत्प्रवृत्त करतात आणि जे सुजाण वाचक निरंतर ग्रंथ वाचन करतात ते काळाच्या पुढे पाहू शकतात.
The art of reading is a skill to understand any kind of communication and interaction. As best as possible.
ग्रंथवाचनाने वैयक्तीक बौद्धिक,भावनिक,शारीरिक विकास होऊन आत्मोन्नती होते.एवढेच नव्हे तर वाचनाचा व्यासंग हा कौटुंबिक उन्नती, समाजोन्नती,राष्ट्रोन्नतीचा यशस्वी राजमार्ग आहे.वाचन संस्कार ही एक राष्ट्रीय चळवळ करण्यासाठी मी आपले मित्रगण,आप्तेष्ट यांना ग्रंथ वाचनाची अमिट गोडी लावीन.ग्रंथासंबंधी सांगोपांग चर्चा,परिसंवाद व समिक्षा लेखन यांसह निरंतर साहित्य लेखनासाठी प्रवृत्त करीन. सर्वतोपरी अखंड ग्रंथसेवा देण्याची प्रतिज्ञा करीत आहे.आमरण संकाल्पित उद्दिष्ट्ये व ध्येयधोरणांशी नैतिक बांधिलकी ठेवेल.ही प्रार्थना आपणही विचारपूर्वक करावी ही सहृद ग्रंथप्रेमींकडून अपेक्षा करतो.
सन्माननीय वाचक, रसिकांना संस्थेच्या ग्रंथसेवा प्रचार प्रसार कार्यात व उपक्रमांत योगदान देण्यासाठी अधिक माहितीस्तव पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.
भावार्थ पुस्तक व्हॅन :- + 91 – 93704 50515
प्रत्यक्ष भेटीसाठी भावार्थ पुणे कार्यालयाचा पत्ता: –
भावार्थ,201/202 ,सारथी सक्सेस स्क्वेअर ,कर्वे रोड, कर्वे पुतळ्या जवळ
कोथरूड – पुणे पुणे – 411038 संपर्क : 92090 76117
भावार्थ,चिपळुण कार्यालयाचा पत्ता :-
भावार्थ,कृष्णेश्वर दर्शन, डॉमिनोज पिझ्झा समोर , मुंबई – गोवा महामार्ग
पागमळा,चिपळूण
चिपळूण – 415605 संपर्क :- 72760 40248

