शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे काळी फित आंदोलन
![]()
शिक्षक दिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे काळी फित आंदोलन
महाराष्ट्र राज्य शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे
मा शिक्षणाधिकारी,जिल्हा / शिक्षण उपसंचालक, विभाग यांचेमार्फत शिक्षणमंत्री यांना पत्र

मुंबई प्रतिनिधी
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या निराकरणासाठी महासंघाने वारंवार प्रयत्न, पाठपुरावा करूनही शिक्षकांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेरीस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी महासंघाशी चर्चा
करून आपण लेखी आश्वासन देत, काही मागण्या मान्य करून केलेल्या आवाहनानंतर महासंघाने आपला बहिष्कार मागे घेऊन
बारावीचा निकाल वेळेत लावला. उर्वरित मागण्यांबाबत हे उन्हाळी अधिवेशन संपताच चर्चा केली जाईल असेही आपण
सांगितले होते परंतु त्यानंतचे पावसाळी अधिवेशन संपून सुध्दा आता महिना उलटला तरी महासंघाशी आपण चर्चा केली नाही
तसेच मान्य मागण्याचे आदेशही निघाले नाहीत. महासघातर्फे आपल्याला अनेक वेळा भेटी घेऊन, निवेदने देऊनही
आश्वासनांची पूर्तता झाली नाही त्यामुळे राज्यातील शिक्षक प्रचंड नाराज आहेत. त्यांची फसवणूक करण्यात आली अशी भावना
निर्माण झाली आहे. अशा स्थितीत राज्यातर्फे शिक्षक दिन साजरा करीत शिक्षकांचे खोटे कौतुक स्विकारण्याची महासंघाची मानसिकता नाही. शिक्षकांच्या समस्या सोडवीत त्यांना आनंद घेता येईल असे वातावरण आपण निर्माण करावे अशी महासंघाची
आग्रही मागणी आहे. त्यामुळे या शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी काळ्या फिती लावण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे.राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावतील व आपणास शिक्षणाधिकान्यांमार्फत निवेदन सादर
करण्यात येईल. मागण्या पुढीलप्रमाणे
१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना तसेच अंशत: अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व
सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
२) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०.२०,३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची
२० टक्क्यांची अट रद्द करावी.
४) बाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा.
५) अघोषित उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशत: अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालवाला प्रचलित
अनुदानसूत्र तातडीने लागू प्रे. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात.
६) बिनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला दि. १ डिसेंबर पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी.
७) शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत.
८) कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्यचे निकष शाळा सहितेनुसार असावेत.
९)
एम. फिल. एम. एड. पीएच.डी. धारक कम वि शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.
१०) उपदानाची रक्कम २०लाख करण्यात यावी व निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे.
११) DCPS / NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी.
१२) कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
१३) अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा.
यासह इतरही सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यावे. महासंघाशी त्वरित चर्चा करावी.
दिनांक : ३/०९/२०२३
आपण या आंदोलनाची दखल गांभीर्याने न घेतल्यास महासंघाला याहून तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याची संपूर्ण
जबाबदारी आपणावर असेल असे निवेदनाद्वारे प्रा. संतोष फाजगे सचिव प्रा. मुकुंद आंदळकर समन्वयक यांनी पत्राद्वारे मागणी १) मान श्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२) मान श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
३) मान श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
४) मान श्री. रणजितसिंह देवोल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण
(५) मान श्री. सूरज मांढरे आयुक्त शालेय शिक्षण ६) मान. श्री. संपतराव सूर्यवंशी शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण
प्रा. डॉ. संजय शिंदे
अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

