1 min read

कथा जीवनानुभवाची जाणीव करून देत असते-
डॉ.अब्दुल करीम सालार

Loading

कथा जीवनानुभवाची जाणीव करून देत असते.
डॉ.अब्दुल करीम सालार

माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांना शब्दात मांडत जीवनातील सुखदुःखाच्या अनुषंगाने जगण्याला जे मार्ग मिळत जातात त्यात बहुतांश मार्ग महापुरुषांनी दिलेल्या विचारवाटेने मिळत जातात तथागत गौतम बुद्ध यांनी आयुष्यातला आनंद हा दुसऱ्याला आनंद प्राप्त साठीच असून दुसऱ्याचा आनंद हा आपल्या सुखाला समृद्ध करणारा असतो हा दिलेला विचार वैशालीची आम्रपाली या कथासंग्रहातून स्पष्टपणे कथालेखक कालकथित प्रल्हाद खरे यांनी मांडलेला दिसून येतो असे विचार इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे आयोजित अथर्व पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या वैशालीची आम्रपाली या कालकथित प्रल्हाद खरे लिखित कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुकुंद भाऊ सपकाळे यांनी तथागत गौतम बुद्धांनी त्या काळात हिंसेच्या विरोधात मानव जातीच्या कल्याणासाठी धम्माच्या माध्यमातून जो विचार रुजविण्याचा प्रयत्न केला तो आजही शेकडो वर्षापासूनचा विचार कायम असल्याने जगातल्या अनेक राष्ट्रांनी या धम्माची शिकवण अनुसरल्याने त्यांची वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती झाल्याचे चित्र सुस्पष्टपणे जाणवताना दिसते त्या काळातल्या ज्या तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रभावित होणाऱ्या व्यक्ती आपल्या जीवनानुभवाचा सार मांडत गेल्या तेच कथा रूपाने कालकथित प्रल्हाद खरे यांनी वैशालीची आम्रपाली या कथासंग्रहातून मांडलेल्या कथातून आपल्या लक्षात येते, त्यांच्या परिवारांने त्यांच्या पश्चात हा कथासंग्रह प्रकाशित केला त्यांच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठविधीज्ञ राजेश झाल्टे, भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, अथर्व पब्लिकेशनचे प्रकाशक युवराज माळी, भीमरमाई प्रतिष्ठानचे सचिव प्रा.डॉ. सत्यजित साळवे,राजेंद्र पारे मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन खरे यांनी तर सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. याप्रसंगी लीलाताई खरे, सुमित खरे यांनी प्रल्हाद खरे यांच्या साहित्य विषयक आठवणींना उजाळा दिला प्रमुख अतिथी राजेश झाल्टे,प्रा.डॉ. के.के. अहिरे डॉ. मिलिंद बागुल, राजेंद्र पारे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत .आभार विजय लुल्हे यांनी मानले कार्यक्रमास डी. एम .अडकमोल , विजयकुमार मौर्य,डॉ. बि.डी. शिरसाट, , प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, राहुल निकम, शिरीष चौधरी, शिवराम शिरसाट, इंदिरा जाधव, संगीता माळी, प्रा.पूजा साळवे भैय्यासाहेब देवरे, मुकुंद सपकाळे,महेंद्र केदार,गोविंद पाटील,सुनील दाभाडे,सुनील सोनवणे ,विजय गवळे,सुमित खरे राहुल निकम
अनेक मान्यवर उपस्थित होते.

फोटो कँप्शन

वैशालीची आम्रपाली कथासंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. अब्दुल करीम सालार ,मुकुंद सपकाळे, राजेश भाऊ झाल्टे, डॉ. मिलिंद बागुल, लीला खरे, प्रा .डॉ.सत्यजित साळवे, युवराज माळी, राजेंद्र पारे, सचिन खरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *