शकील पिंजारी यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान
![]()

शकील पिंजारी यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी शकील पिंजारी हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे होते. तसेच माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, सह चिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील हे उपस्थित होते.
शकील पिंजारी यांनी महाविद्यालयातील विविध विभागात काम केले.१९९५ पासून वसतिगृह विभाग, रसायनशास्त्र, ग्रंथालय विभाग, मुख्य कार्यालय आदी ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. शेवटी प्रयोगशाळा सहाय्यक पदावर ते सेवानिवृत्त झाले.
याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, कुलसचिव आबासाहेब मैराळे,भटू चौधरी, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे, सचिव अजय साटोटे, संजय भिला पाटील, नरेंद्र सातपुते, बाळू देवकाते, उमेश ठाकूर, देवेंद्र कांबळे, दुर्योधन नेरकर, कैलास सैंदाणे, बापूराव पाटील, गुणवंत वाघ, योगेश बोरसे, योगेश चौधरी, प्रकाश डंबेलकर, महेंद्र चौधरी, प्रवीण धनगर, विनोद कोठावदे, संदीप बिऱ्हाडे, संदीप सोनवणे, दिनेश ठाकूर, शाबीर भाई, पराग पाटील, रोहित ठाकूर, नितीन राजपूत आदी उपस्थित होते.

