अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करा,उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
![]()

अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करा
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
या वर्षी पाऊसाला उशीरा सुरवात झाली त्यामुळे खरीप हंगामाला / पेरणीला उशिरा सुरुवात झाली. तसेच मागील सुमारे 25 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे येणारे खरीप हंगामाचे उत्पन्नात साशंकता असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच तोड़ी आलेला घास हातातुन गेल्याने तालुक्यातील शेतकरी हे हवादील झालेले आहेत. तसेच आजपासूनच तालुक्यातील आज गावांचा पिण्याचे पाण्याचे संकट देखील आहे. तसेच पुढील दिवसात गुरांना चाऱ्यासाठी उपाय योजना करावी व पीक विमा 40% ची रक्कम लगेच असे जाहीर करून अदा करावी व विद्याथ्र्यांची शैक्षणिक शिक्षणाची फी पुढे माफ करावी तसेच खाजगी कोचिंग च्या संचालकांना 50% फी घेण्याचे आदेश दयावे व चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करान्यासाठी अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा ही नम्र विनंती. अन्यथा आम्हांला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी.असे तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील शहरध्यक्ष शाम जयवंतराव पाटील प्रदेश सरचिटनिस तिलोत्तमा पाटील प्रदेशअध्यक्ष ग्रंथालय उमेश पाटील प्रदेश सचिव ग्रंथालय रिता बाविस्कर डाॕ किरण पाटील प्रा.अरुन शिंदे मनोहर पाटील यांनी केले आहे.

