1 min read

अमळनेरला 3 सप्टेंबरला रोहित पवारांचा दौरा..शेतकरी ,कष्टकरी व विद्यार्थ्यांच्याशी करणार हितगुज

Loading

अमळनेरला 3 सप्टेंबरला रोहित पवारांचा दौरा..
शेतकरी ,कष्टकरी व विद्यार्थ्यांच्याशी करणार हितगुज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती.

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व आमदार रोहित पवार व रोहीत आर पाटील यांचा अमळनेरला 3 सप्टेंबरला दौरा आहे. वेगवेगळ्या विषयांवर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी व विविध बंधू-भगिनींशी संवाद साधणार आहेत.
अमळनेरला नुकतीच पत्रकार परिषदेत झाली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले. प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले.
5 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब जळगांवला सागर पार्क येथे त्यांच्या सभेचे आयोजन दुपारी 2 ते 5 या वेळेत केले आहे. अमळनेर मधून 3000 हजार कार्यकर्ते जाणार आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी व विविध विषयांवर शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व मा.शरच्चंद्र पवार साहेब यांच्यावर प्रेम करणा-या बंधू व भगिनीशी
हितगुज करण्यासाठी आमदार रोहित पवार व युवा नेते रोहीत आर पाटील अमळनेरला 3 सप्टेंबरला शिवाजी नाट्य सभागृहामध्ये येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी अमळनेर येथील जास्तीत जास्त समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महिला बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील, शहरध्यक्ष शाम जयवंतराव पाटील, प्रदेश सरचिटनिस तिलोत्तमा पाटील, प्रदेशअध्यक्ष ग्रंथालय उमेश पाटील, प्रदेश सचिव ग्रंथालय रिता बाविस्कर ,डाॕ किरण पाटील अरुन शिंदे, मनोहर पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *