1 min read

कविता जगता येणे म्हणजेच जीवनाची दिशा ठरवणे होय.
कवि गणेश आराघ

Loading

कविता जगता येणे म्हणजेच जीवनाची दिशा ठरवणे होय.
कवि गणेश आराघ
शेतकऱ्याचं, वंचितांच, उपेक्षितांच, दुःख वेदना कवितेतून व्यक्त होत जाते त्यावेळी माणूस म्हणून आपल्या जाणीवा आपणच लक्षात घेणं आवश्यक असून विद्यार्थी जीवनापासून पाठ्यपुस्तकातील कविता, कथा वाचल्यानंतर त्या निश्चितपणे आपल्या जीवनाच्या दिशा ठरवत असतात यासाठी वास्तव जीवनाच्या जाणिवा आपल्याला प्रगती आणि अधोगतीच्या सीमा लक्षात आणून देत असतात असे मत कवी गणेश आघाव यांनी सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे मराठी विभागातर्फे चला कवीला भेटूया या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल तर विचार मंचावर ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन, शिक्षिका मंगला नारखेडे, सोपान पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारती पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख शुभांगीनी महाजन यांनी तर आभार संतोष कचरे यांनी मानले.याप्रसंगी हेमांगी पाटील,रेश्मा चिरमाडे , प्रज्ञा कापडणे,फाल्गुनी कोल्हे,गायत्री चौधरी यांनी कवी गणेश आघावं यांच्या कवितेबद्दल आपली मत मांडलीत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावना चौधरी व मराठी विभागातील शिक्षकांनी प्रयत्न केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *