1 min read

कल्याण येथे १५ वी सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन.

Loading

कल्याण येथे १५ वी सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी): ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनच्या माध्यमातून शनिवार ९ सप्टेंबर रोजी १५ वी ठाणे जिल्हा सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, कर्णिक रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होवू शकतील. आट्या पाट्या हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट झाल्यामुळे ठाणे, कल्याण ,नवी मुंबई, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी व मुरबाड या तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आट्या पाट्या खेळाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी व वरिष्ठ खेळाडू मोठ्या उत्साहाने करत आहेत. कार्यवाह संजय काळे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व क्रीडा मंडळांना आट्या पाट्या खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तरी सर्व खेळाडू आणि क्रिडा संचालक, क्रिडा शिक्षक बंधू भगिंनिनी खालील नंबरवर संपर्क करावा. ९०२२५६१६८३. अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रिडा संघटक अंकुर आहेर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *