1 min read

आदिवासी समाजातील आकाश भिल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सचीन पाटील यांनी कुटुंबातील व्यक्तीची केली विचारपूस

Loading

आदिवासी समाजातील आकाश भिल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सचीन पाटील यांनी कुटुंबातील व्यक्तीची केली विचारपूस

आकाशच्या मुत्युला दोषी असणाऱ्यावर
कठोर कारवाई करण्याची केली मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-राष्ट्रवादी काग्रेसचे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सचीनभाऊ पाटील व त्यांच्या मित्र परीवाराने सामाजिक बांधीलकी जोपासत
अमळनेर तालुक्यातील डांगर येथील एका बालकाचे सर्पदंशमुळे मुत्यु झाल्याने त्या परीवाराचे सात्वन करत आकाशच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आम्ही परिवाराच्या पाठीशी आहोत असे सांगितले.
सविस्तर माहिती अशी कि काल दि.30 रोजी डांगर बुद्रुक येथे सर्पदंश मुळे आदिवासी समाजातील 10 वर्षाचा बालक आकाश राजेंद्र भिल याचा दुर्दैवी मृत्यू झाला.आकाश च्या कुटूंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली असता… त्या वेळी कुटूंबातील सदस्यांनी सांगीतले की वेळीच उपचार व जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांनी योग्य सल्ला न दिल्या मुळे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाव लागले तिथे देखील योग्य पध्दतीने उपचार न मिळाल्यामुळे आकाश चा मृत्यू झाला…
त्या कुटूंबाची संपूर्ण माहिती घेतल्या नंतर आज ग्रामीण रुग्णालयात येथे जाऊन आकाशच्या झालेल्या घटनेची चौकशी केली…
व त्यात काही बाबी अश्या लक्ष्यात आल्या की सदरील डॉक्टरांचा एकमेकांशी सुसंवाद नसल्यामुळे व ग्रामीण रुग्णालयात व्हेटिलेटर असून ते वापरत नसल्यामुळे या बालकाचा दुर्दैवी झाला असावा असे लक्षात येते…
या घेटनेची सखोल चौकशी व्हावी या साठी जिल्हाशल्य चिकित्सक व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी करू असे सांगितले.

चौकट
या घटनेची लागलीच दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व त्यांच्या मित्र परिवाराने घेत कुटुंबाची विचारपूस करत आकाशाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली व आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आकाशच्या परिवाराबरोबर आहोत असे सांगितले

सचीन पाटील
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *