लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त-गुलाबराव वाघ शिवसेना संपर्क प्रमुख
![]()
लोकप्रतिनिधी मस्त,शेतकरी त्रस्त
गुलाबराव वाघ -शिवसेना संपर्क प्रमुख


धरणगाव प्रतिनिधी
आम्ही सर्व शेतकरी वरील विषयावर सहायक कार्यकारी अभियंता धरणगांव शहर व तालुका यांना निवेदन देण्यात आले, मागणी आकस्मित लोड शेडींग सुरु केलेली दिसत आहे.पहिलेच पावसाने दडी मारल्याने पिक सुकण्याचा मार्गावर आहेत, आता शेतकरयांनी पिकांना पाणी देण्याचे सुरु केले असल्याने, त्या मधे लोड शेडींग होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचण ठरत आहे, पाऊस नसल्याने पिकांची वाढ देखिल खुंटलेली आहे.लोकप्रतिनी मस्त आणि शेतकरी त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास मुकावे लागत असून अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे, याला कोण जबाबदार आहे, तसेच
प्रत्येक नागरिकाला विज पुरवण्याचे महावितरण चे धोरण असून , त्यांचे कुठेतरी धोरणाची पायमल्ली होत आहे.
वरील गोष्टीची अडचणी लक्षात घेता आपण आठ ते दहा दिवसांत लोड शेडींग बंद नाही केले तर आपल्या मागणीसाठी सर्व शेतकरी व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील व होणा-या परीणामास महावितरन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी आज धरणगाव महावितरणला लोड सेटिंग समस्या बाबत, धरणगाव उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी शिवसेना सह संपर्कप्रमुख, गुलाबराव वाघ, मा लोकनियुक्त नगराध्यक्ष युवा सेना जिल्हाप्रमुख, निलेश चौधरी, तालुकाप्रमुख, जयदीप पाटील, मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम भाऊ पाटील , शहर प्रमुख, भागवत चौधरी, मा नगरसेवक, शेतकरी तालुका प्रमुख विजय पाटील , उप तालुका प्रमुख नंदू पाटील. तालुका उप संघटक लीलाधर पाटील तालुका समन्वयक संतोष सोनवणे, युवा सेना शहर प्रमुख पप्पू कंखरे.नारायण महाजन ,नरेंद्र शिरसाट, महेश चौधरी, सुभाष महाजन. राहुल रोकडे, नाना ठाकरे सचिन चव्हाण. विनोद रोकडे .गोपाल पाटील तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

